सर आली धाऊन.. मुख्याध्यापक गेले वाहून!

By Admin | Updated: June 17, 2014 08:30 IST2014-06-17T08:30:10+5:302014-06-17T08:30:10+5:30

शिक्षण संचालकांच्या आदेशाला खो देणार्‍या जामनेर तालुक्यातील २0 शाळांना शिक्षण विभागाने दणका देत मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्या.

Sir was there .. Headmaster went! | सर आली धाऊन.. मुख्याध्यापक गेले वाहून!

सर आली धाऊन.. मुख्याध्यापक गेले वाहून!

जामनेर/जळगाव : दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सोमवारपासून गजबजल्या. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शाळांनी विविध उपक्रम राबवून मुलांचे अभिनव स्वागत केले. तर शिक्षण संचालकांच्या आदेशाला खो देणार्‍या जामनेर तालुक्यातील २0 शाळांना शिक्षण विभागाने दणका देत मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्या. तशातच चाळीसगाव भागात पावणे पाचच्या सुमारास जलधारांनी भुईवर अभिषेक केला. मेहुणबारे, देवळी, आडगाव, दरेगाव, लोंढे, डोणपिंप्री, हिरापूर, गणेशपूर, करगाव, वडगाव लांबे, वडाळा-वडाळी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. वीज कोसळल्याने तळोंदा येथील शिवाजी पाटील यांची गाय ठार झाली. 
 
मुख्याध्यापकांना नोटिसा
देऊळगाव (उर्दू), मोयखेडा, बोरगाव, देवपिंप्री, किन्ही, इंदिरानगर (नेरी), लों्रढी, मालखेडा, देऊळगाव (मराठी), पहूर (कन्या व मुले), कर्णफाटा, नेरी दिगर, वाकोद (मराठी), होळहवेली, तळेगाव आणि जामनेर (उर्दू) जामनेर मराठी मुलांची शाळा, नूतन प्राथमिक विद्या मंदिर या शाळांना प्रवेशोत्सव पाहणी समितीने अचानक भेटी दिल्या.वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि दैनिक टाचण केलेले आढळून आले नाही. तसेच कामांमध्ये उणिवा आढळून आल्या. त्यामुळे तिथल्या मुख्याध्यापकांना 'कारणे दाखवा' नोटिस बजावण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी सांगितले.

 

Web Title: Sir was there .. Headmaster went!