दुकाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:12+5:302021-04-23T04:38:12+5:30

गुरांचा बंदोबस्त करा धुळे : शहरात विविध रस्त्यांवर मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण ...

Shops closed | दुकाने बंदच

दुकाने बंदच

गुरांचा बंदोबस्त करा

धुळे : शहरात विविध रस्त्यांवर मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. गुरुवारी म्हशींनी रस्ताच अडविला होता. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती.

शहर खड्डेमय

धुळे : शहरात गेल्या दोन वर्षांपासून या ना त्या कारणाने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे खोदण्याचे काम सपाट्याने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यांची पुरती वाट लागली असून रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

नियम पाळणे गरजेचे

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोचा संसर्ग वाढत असताना काही नागरिकांची बेफिकिरी आजही कायम आहे. कोरोनाच्या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. काही जण तर मास्कचा वापर शोभेची वस्तू म्हणून करीत आहेत.

पोलीस तैनात

धुळे : शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तरीदेखील काही नागरिक फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर वचक निर्माण करावा.

Web Title: Shops closed