गुजरातमध्ये शिरपूरचा संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST2021-03-17T04:36:51+5:302021-03-17T04:36:51+5:30

काठीवाडा खस अलीराजपुर येथे राज्यातील सोळा संघांना आमंत्रित करून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाचे ...

Shirpur team wins in Gujarat | गुजरातमध्ये शिरपूरचा संघ विजेता

गुजरातमध्ये शिरपूरचा संघ विजेता

काठीवाडा खस अलीराजपुर येथे राज्यातील सोळा संघांना आमंत्रित करून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाचे आयोजन स्थानिक राज घराण्याकडून करण्यात येत असून, या स्पर्धेत शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघाने प्रथमच सहभाग नोंदविला.

स्पर्धेत शिरपूर संघाने गुजरात राज्यातील महाकाल ११ खुशी, डी.एस.के.२, बी.एस.सी. बरोडा, कृषी व ११ या संघांना नमवत स्पर्धेचे प्रथम स्थान पटकावले. काठीवाडाचे राजे दिग्विजयसिंग राणा यांचे हस्ते शिरपूर संघास रोख ५१ हजार व ट्रॉफी पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत संघातर्फे कर्णधार कुणाल गिरासे, मेहुल पटेल, प्रशांत ढोले, लोकेश देशमुख, दानेश पटेल, आनंद जगताप, संमेक जगताप, अनिकेत मोरे, फरदीन शेख, तरवेश पाटील, प्रद्युम्न महाजन, ऋषभ कारवा, सौरभ सिंग या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. क्रिकेट प्रशिक्षक राकेश बोरसे व संदीप देशमुख यांनी संघाला मार्गदर्शन केले.

संस्थेच्या क्रीडा विभागाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रीतेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, मुख्याध्यापक पी.व्ही पाटील, एस.बी.पवार, सी.डी. पाटील यांनी कौतुक केले.

Web Title: Shirpur team wins in Gujarat