शिरपूरला मुख्याधिकारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST2021-04-16T04:36:38+5:302021-04-16T04:36:38+5:30

गुरुवारी शहरातील मेन रोडवरील लघु व्यावसायिकांसह आस्थापनाधारकांना कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ़ अमोल बागुल यांनी केले़. ...

Shirpur on the main road | शिरपूरला मुख्याधिकारी रस्त्यावर

शिरपूरला मुख्याधिकारी रस्त्यावर

गुरुवारी शहरातील मेन रोडवरील लघु व्यावसायिकांसह आस्थापनाधारकांना कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ़ अमोल बागुल यांनी केले़. गुजराथी कॉम्प्लेक्स, महाराजा कॉम्प्लेक्स, पाचकंदिल चौकातील लघु व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते तसेच ‘अत्यावश्यक सुविधा’ म्हणून सुरू असलेले दुकानधारकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले़ नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या़, तसेच आस्थापनांत सुरू असलेल्या दुकानधारकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले की नाही याची देखील विचारणा करण्यात आली़ ज्यांनी अद्यापपर्यंत घेतली नसेल त्यांनी तातडीने टोचून घेण्याचे देखील त्यांनी आवाहन केले़. विना मास्क असलेल्या आस्थापनधारकांना त्यांनी तंबी देत यापुढे मास्क न वापरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल़ दुकानांत गर्दी होणार नाही, वारंवार सॅनिटायझरचा वापर करा, नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे संकेतदेखील त्यांनी दिले. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ तहसीलदार आबा महाजन यांनीदेखील करवंद नाक्याजवळील भाजीपाला मार्केट व ग्रामीण भागात भेटी देऊन गर्दी न करण्याचे आवाहन करून मास्क वापरण्याचे आवाहन केले.

Web Title: Shirpur on the main road