का.स.वाणी मुद्रण शिक्षण संस्थेत रोजगार संधीवर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST2021-02-27T04:48:14+5:302021-02-27T04:48:14+5:30

संस्थेचे विश्वस्त जितेंद्र साेनगिरे यांनी जाेहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ऑनलाइन कार्यक्रमाचे उद‌्घाटन केले. या चर्चासत्रात डाॅ.बाबासाहेब ...

Seminar on Employment Opportunities at KSVani Printing Education Institute | का.स.वाणी मुद्रण शिक्षण संस्थेत रोजगार संधीवर चर्चासत्र

का.स.वाणी मुद्रण शिक्षण संस्थेत रोजगार संधीवर चर्चासत्र

संस्थेचे विश्वस्त जितेंद्र साेनगिरे यांनी जाेहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ऑनलाइन कार्यक्रमाचे उद‌्घाटन केले. या चर्चासत्रात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुद्रण तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.पराग हसे यांनी मार्गदर्शन केले. मुद्रण क्षेत्राची विश्वासार्हता व डिजिटल तंत्रज्ञानाने केलेले बदल यावर व्यापक चर्चा करून विद्यार्थ्यांनी भविष्यातील आव्हानांना सामाेरे जाण्यासाठी सज्ज असायला हवे असे सांगितले. २१ व्या शतकातील फादर ऑफ डिजिटल प्रिटिंग बेनी लांडा यांच्या नॅनाेग्राफी तंत्रज्ञानावर त्यांनी माहिती दिली. का.स. वाणी संस्था ही राेजगारभिमुख शिक्षण देणारी संस्था असून विद्यार्थ्यांना ऑन जाॅब ट्रेनिंग देत असल्याबद्दल संस्थेविषयी हासे यांनी गाैरवाेद‌्गार काढले. संस्थेचे शिक्षण विभागप्रमुख प्रसाद पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जितेंद्र साेनगिरे यांनी डाॅ.जगन्नाथ वाणी यांचे संस्था स्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे समाधान व्यक्त केले. संस्थेतून सुमारे एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थी स्वयंराेजगार प्राप्त करून या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, टेक्नाेव्हा कंपनीचे अधिकारी राकेश गाेयधनी, स्थानिक मान्यवर मुद्रक यांनी ऑनलाइन सहभाग नाेंदवला. दाेन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित हाेते.

Web Title: Seminar on Employment Opportunities at KSVani Printing Education Institute