शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान करीत शाहु महाराजांना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:59 IST

रक्तदान शिबिर : मराठा सेवा संघाचे कार्यालय, प्रतिसाद

धुळे : लोकहितकारी राजे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ बिग्रेड व मराठा सेवा संघाच्यावतीने रक्तदान करुन त्यांना अभिवादन करण्यात आले़ गणपती पुलाजवळील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला़ सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून हा उपक्रम घेतल्याचे आयोजकांनी म्हटले आहे़याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले़ त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या धुळे जिल्हा संघटक शिवमती सिमा वाघ यांनी रक्तदान करुन शिबिराला प्रारंभ केला़ याप्रसंगी यशवर्धन कदमबांडे, मनोज मोरे, साहेबराव देशमुख, प्रविण पाटील, आनंद पाटील, मंडाले, लहू पाटील, रणजित भोसले, विरेंद्र मोरे, रामकृष्ण पाटील यांच्यासह शिवमती सुमती पाटील, शहराध्यक्ष डॉ़ पूजा भामरे, नुतन पाटील, अर्चना साळुंखे, चंद्रकला कुवर, मिना ठाकरे, सुनीता सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़याप्रसंगी युवा नेते यशवर्धन कदमबांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रणजित भोसले यांचा सन्मान करण्यात आला़ रक्तदान शिबिराला रक्तसेवा रक्तपेढीचे सहकार्य लाभले़मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या रक्तदान शिबिरात सायंकाळी उशिरापर्यंत ४६ बाटल्यांचे संकलन झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे