रेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 01:37 PM2021-04-13T13:37:41+5:302021-04-13T13:45:42+5:30

स्थानिक गुन्हे शाखा : तिघांना अटक, तिघांची चौकशी सुरु

Remadesivir's black market gang Gajaad | रेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड

रेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी गजाआड

Next

धुळे : कोरोनाने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी औषधोपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिविर इंजक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा झालेला आहे. त्याचा काळा बाजार होऊ लागल्याने ही बाब प्रशासकीय पातळीवरुन गांभिर्याने घेण्यात आलेली आहे. अशातच एक जण जादा किंमतीने रेमडेसिविर देत असल्याची माहिती मिळताच बनावट ग्राहक पाठवून त्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्याच्या चौकशीनंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली असून तिघांची चौकशी सुरु आहे.

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे रेमडेसिविर हे इंजक्शन अतिशय आवश्यक असताना नेमका त्याचाच तुटवडा हा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी ही बाब गांभिर्याने घेवून काळा बाजार रोखण्यासाठी पावलं उचलण्यास सुुरुवात केली आहे. एक जण गरजू रुग्णांना जादा दराने इंजक्शन विकत असल्याची गोपनीय माहिती मिळताच बनावट ग्राहक तयार करुन त्याला दत्त मंदिर चौकात पाठविण्यात आले. तोपर्यंत याठिकाणी पोलिसांनी सापळा लावला होता. इंजक्शन जादा दराने विक्री करत असतानाच कृष्णा भिकन पाटील (२२, रा. प्लॉट नंबर ६१, फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी) या तरुणाला सुरुवातीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून त्याला मदत करणारे सागर विलास भदाणे (२६, रा. प्लॉट नंबर ८७, फाॅरेस्ट काॅलनी, नगावबारी) आणि चितेश कैलास भामरे (२२, रा. यशवंत नगर, साक्री रोड, धुळे) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून आणखी तिघांची नावे समोर आली असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अटकेतील तिघांविरुध्द विविध कलमान्वये देवपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोलीस कर्मचारी संदिप थोरात, प्रकाश सोनार, योेगेश जगताप, श्रीशैल जाधव, संजय सुरसे, कैलास महाजन, मनोज पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन शेवतकर यांनी ही कारवाई केली. कारवाईप्रसंगी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश देशपांडे यांची उपस्थिती होती.

Web Title: Remadesivir's black market gang Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे