शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांचे स्थलांतर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST

धुळे : बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांचे विविध भागांत स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी विक्रेते मात्र पुन:पुन्हा ...

धुळे : बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांचे विविध भागांत स्थलांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी विक्रेते मात्र पुन:पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे भाजीपाला आणि फळेविक्रेत्यांचे स्थलांतर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी... असे म्हणण्याची वेळ आली आहे.

१५ दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये जीवनावश्यक असल्याने भाजीपाला आणि फळे विक्रीला मुभा दिली आहे; परंतु पाचकंदील आणि आग्रा रोडवर भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची तर गर्दी आहेच; पण भाजीपाला खरेदीसाठीही सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बाजारात येताना नागरिक मास्क वापरत असले तरी सोशल डिस्टन्सिंग मात्र पाळत नाहीत. काहीजण मास्कचा वापर आदर्श पद्धतीने न करता केवळ पोलिसांना घाबरून देखावा म्हणून मास्क लावून फिरतात. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्याचे परिस्थिती गंभीर होऊ शकते. शनिवारी तब्बल ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

स्थलांतरित जागेवर धंदा होईना...

बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पाचकंदील आणि आग्रा रोडवरील भाजीपाला आणि फळविक्रेत्यांचे वेगवेगळ्या भागांत स्थलांतर करण्यात आले. परंतु विक्रेते पुन्हा पुन्हा पाचकंदील आणि आग्रा रोडवर धाव घेत आहेत. पोलीस आणि पालिकेच्या पथकाने पाठ फिरवल्याबरोबर हे विक्रेते स्थलांतरित जागेवरून नेहमीच्या ठिकाणी जातात. ग्राहकांना देखील कोरोनाचा संसर्ग आणि शासन-प्रशासनाच्या नियमांचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. कोरोना झाल्याशिवाय हे लोक घरात स्वस्थ बसणार नाहीत, अशा प्रतिक्रिया आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या सूचनेनुसार एका प्रामाणिक विक्रेत्याने क्युमाईन क्लबजवळ भाजीपाल्याची हातगाडी लावली; परंतु या ठिकाणी ग्राहक फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्याचा धंदा बुडाला.

स्थलांतरित केले तरीदेखील काही विक्रेते पाचकंदील चाैकातच व्यवसाय करण्यासाठी येत आहेत.