शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना दिलासा : उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST

दोडाईचा : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येत अस्वस्थ कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यास अडचण येते. त्यात त्या अस्वस्थ कोरोनाबाधित ...

दोडाईचा : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येत अस्वस्थ कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यास अडचण येते. त्यात त्या अस्वस्थ कोरोनाबाधित रुग्णाचा जीव गमावण्याची भीती असते. अशा विपरीत परिस्थितीत अस्वस्थ रुग्णास तत्काळ बाहेरून ऑक्सिजन पुरवावा लागतो. अस्वस्थ रुग्णास बाहेरून ऑक्सिजन पुरविण्यासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन मिळाले आहेत. त्यामुळे अस्वस्थ रुग्णास दिलासा मिळणार आहे.

मार्च - एप्रिल महिन्यांत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णसंख्या खूपच वाढली . रुग्णसंख्या वाढत असतानाच बाहेरून ऑक्सिजन पुरवठाही वाढला. ऑक्सिजन पातळी कमी होऊन ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावण्याची संख्या पण वाढली. मार्च-एप्रिल महिन्यांत दोडाईचात ६० जणांचा मृत्यू झाला.

बऱ्याच वेळी अस्वस्थ रुग्ण दाखल करत असतानाच मृत होतात. ऑक्सिजन सिलिंडरने ऑक्सिजन पुरविणे त्यात वेळ जातो. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी स्थिर राखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे असते. रुग्णास औषधीबरोबरच ऑक्सिजनची गरज भासते.

बऱ्याच वेळी ऑक्सिजनयुक्त बेड मिळत नाही. अशा वेळी ऑक्सिजनयुक्त बेड मिळेपर्यंत रुग्णास

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनने तत्काळ बाहेरून ऑक्सिजन देऊन रुग्णास जीवदान मिळू शकते.

उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध झाली असून, त्यांची चाचणीही झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी भूषण काटे यांनी दिली .

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन हवेच्या माध्यमाने दिवसाला पाच लिटर ऑक्सिजनची निर्मिती करते. एवढा ऑक्सिजन एका रुग्णास पुरेसा असतो.

दरम्यान, घरी उपचार करून घेणाऱ्या बऱ्याच रुग्णांनी हे मशीन घेऊ लागेल. तेव्हा ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था केली आहे. काही व्यावसायिकांनी सदर मशीन भाडोत्री तत्त्वावर देणे सुरू केल्याने रुग्णाची सोय झाली आहे.

फोटो-उपजिल्हा रुग्णालयात

ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनसोबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण काटे व इतर कर्मचारी.