शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचात अपंगांना मिळाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:07 IST

ंरोटरी क्लबचा उपक्रम : आतापर्यंत २५००जणांना बसविले पाय

दोंडाईचा : विविध आजारात, अपघातात अपंगत्व आलेल्यांना जयपूर फूट व रोटरी क्लबच्या सामाजीक उपयुक्त प्रकल्पामुळे आशेचा किरण गवसला आहे. निराधार, अपंगत्व आलेल्यांनी जगण्याची उमेद सोडली असतांनाच जयपूर फुटच्या माध्यमातून त्यांना दोंडाईचातच मोफत पाय बसवून मिळाल्याने अपंगाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. गेल्या पंधरा वर्षात जयपूर फुटचा माध्यमाने सुमारे २५०० जणांना मोफत पाय बसविण्यात आलेत.यातील अकाली अपंगत्व आलेले व दोन्ही पाय गमावून बसलेले चक्क मोटरसायकल चालवितात, तर राजस्थानचा एकजण ट्रक चालवीत आहे. कृत्रिम पाय बसविला असल्याचे त्यांच्या चालण्यातून लक्षातही येत नाही हे विशेष.नुकतेच रोटरी हॉलला सुमारे २५ जणांना रोटरी क्लब सिनियर्स व मुंबईच्या ओसवाल मित्र मंडळाच्यावतीने पाय बसविण्यात आले. अध्यक्षस्थानी सरकारसाहेब रावल होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे ओसवाल ट्रस्टचे सी.एल. जैन, डॉ.प्रकाश बोरा, अजित कूचेरिया म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक राजेश मुनोत यांनी केले. या वेळी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष डॉ.सचिन पारख, सचिव चेतन सिसोदिया, डॉ.अनिल सोहोनी, डॉ.मुकुंद सोहोनी, हुसेनभाई विरदेलवाला आदी उपस्थित होते.मुंबईला न जाता दोंडाईचात आता कृत्रिम पाय बसवण्याची सोय झाल्याने अपंगत्व आलेल्यांचे आर्थिक व शारीरिक श्रम वाचत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून रोटरी भुवन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जयपूर फूट पाय बसविण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान येथील अपंग येथे पाय बसविण्यासाठी येतात. आतापर्यंत २५०० जणांना मोफत पाय बसविण्यात आलेत. दोन्ही पाय गमावून बसलेले यांना पाय मिळाल्याने सहज मोटरसायकल चालवितात.अपंगांना पाय बसविण्याचे काम दीपक ठाकूर करीत असून नंतर दुरुस्तीचे कामही करून देतात, अशी माहिती आयोजकांनी दिली. सदर कार्यक्रमात सरकारसाहेब रावल, सी.एल. जैन, हुसेन विरदेलवाला, डॉ.प्रकाश बोरा आदींनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे