मांडळ धरणातून बोरी नदीपात्रात पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:23+5:302021-05-12T04:37:23+5:30

या गावांकरिता मांडळ धरणातून आवर्तन सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेची बैठक ४ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. ...

Release water from Mandal dam into Bori river basin | मांडळ धरणातून बोरी नदीपात्रात पाणी सोडावे

मांडळ धरणातून बोरी नदीपात्रात पाणी सोडावे

या गावांकरिता मांडळ धरणातून आवर्तन सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेची बैठक ४ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व यंत्रणेच्या शिफारशीनुसार या धरणातून ३.०३७ दशलक्ष घनफूट आरक्षित पाणी १० मेनंतर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तहसीलदार, धुळे ग्रामीण यांनी टंचाईसदृश स्थिती असल्याचा अहवाल सादर केला आहे. मांडळ, बोरकुंड, रतनपुरा (ता. धुळे) या गावांपर्यंत पाणी घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, उप अभियंता वीज वितरण कंपनी, पोलीस निरीक्षक, उपअभियंता पाटबंधारे विभाग व तलाठी, ग्रामसेवक यांची संयुक्तिकरीत्या राहील. पाटबंधारे विभागाने त्यांच्या स्तरावर उक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक स्थापन करून या पथकाने नदीप्रवाहात अवैधरीत्या पाणी अडविणे व अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. पाणीपट्टीची रक्कम कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, धुळे यांनी पाटबंधारे विभागास जमा करून देऊन त्यानंतरच पाणी सोडण्याची कार्यवाही करावी. संबंधित गावांना आवर्तन सोडल्याबाबत विविध माध्यमांतून अवगत करण्याची कार्यवाही संबंधित कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांनी करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी यादव यांनी आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Release water from Mandal dam into Bori river basin