कुरखळी येथे विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:15+5:302021-07-15T04:25:15+5:30

अभाविप ही जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे हा आहे. ही ...

Recreational education activities for students at Kurkhali | कुरखळी येथे विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण उपक्रम

कुरखळी येथे विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण उपक्रम

अभाविप ही जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना आहे. या संघटनेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे हा आहे. ही परिषद राष्ट्रहिताच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असते. शिरपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने "परिषद की पाठशाला" हा उपक्रम राबविण्यात आला. शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावात हे अभियान राबविण्यात आले. तेथे बालवाडीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रती रुची वाढावी म्हणून प्रयत्न करण्यात आले. कोरोनाच्या काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले, त्यांच्या मनात शाळेची ओढ पुन्हा जागृत करण्याचे मोलाचे कार्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे.

गावातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व त्यांना चालना देण्यासाठी विविध खेळ व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात निबंध स्पर्धा व त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची उजळणी करून देण्यात आली. तसेच गरजू विद्यार्थ्यांना पाठी वाटप करण्यात आली व शिक्षणाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून प्रोत्साहन करण्यात आले. गावातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी यास पाठिंबा दिला.

या अभियानात विध्यार्थ्यांत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले. सोबतच पालकांमध्ये मुलांच्या अभ्यासाबाबत जागृती करण्यात आली. परिषद की पाठशाला हा उपक्रम सुंदर व नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात आला.

सदर अभियान राबविण्यासाठी याप्रसंगी अवधूत मोरे, पत्रकार योगेश्वर मोरे, राज मोरे, मनीष मोरे, प्रनिकेत मोरे, वैभव मोरे, हर्षल मोरे, शिव मोरे , उज्ज्वल मोरे, कल्पेश मोरे, पवन धनगर, कार्तिक मोरे, चेतन मोरे, जिल्हा प्रमुख नयन माळी, तालुका प्रमुख आकाश प्रसन्न जैन, सहप्रमुख हंसराज चौधरी यांच्या नेतृत्वात गणेश चौधरी, नंदकिशोर राजपूत, भावेश शिंपी, हर्षदा सैदाणे, स्वराज लोहार, उमेश इशी, विवेक चौक, लकी माळी, पार्थ राजपूत, हेमंत भामरे, प्रज्ञेश पटेल, दीपक पावरा, गणेश पावरा, कार्तिक पाटील, शुभम पवार, अखिलेश जाधव, राज मोरे, भावेश राजपूत, संस्कार यादव यांनी मेहनत घेतली.

Web Title: Recreational education activities for students at Kurkhali