दोंडाईचात १४ दुुकानांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST2021-04-08T04:36:28+5:302021-04-08T04:36:28+5:30

कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मिनी लॉकडाऊन सुरू केले आहे. असे असतानाही ...

Punitive action against 14 shops in Dondaicha | दोंडाईचात १४ दुुकानांवर दंडात्मक कारवाई

दोंडाईचात १४ दुुकानांवर दंडात्मक कारवाई

कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मिनी लॉकडाऊन सुरू केले आहे. असे असतानाही बुधवारी दोंडाईचातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने सुरू होती. त्यामुळे अपर तहसीलदार सुदाम महाजन, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम,उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व त्यांचा पथकाने शहरात फिरून पाहणी केली. शासनाच्या नियमानुसार दुकाने बंद न करता सोशल डिस्टन्स न ठेवणे, मास्क न लावणे. यानुसार -प्रशासनाने प्रदीप बुक ,मोरे ऑटो गॅरेंज, श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स, जगताप टेलर, नक्ष मेन्स, ऊस रसवंती-प्रवीण परदेशी, सावंत इलेक्ट्रिक, पूजा इलेक्ट्रिक, नागाई महाजनरल, नागाई कलेक्शन, गणेश हॉटेल, जयगुलाब बाबा रेस्टॉरंट, विजय हॉटेल, बोथरा किराणा, नईम खाटीक या आस्थापनेवर दंडात्मक कारवाई केली. यांच्याकडून ५ हजार १०० रुपयांचा एकत्रित दंड वसूल केला आहे.

नियमांचे पालन होण्याची गरज

गेल्या काही महिन्यांपासून दोंडाईचा परिसरात कोरोनाबाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेकजण विनामास्क फिरताना दिसतात तसेच काही कारण नसतानाही काही भागांमध्ये गर्दी होत असते. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढलेले आहे. प्रत्येक नागरिकाने कोरोनाचे नियम पाळावेत असे प्रशासनाने वारंवार आवाहन केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने, कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाने पुन्हा एकदा मिनी लॅाकडाऊन जाहीर केलेला आहे. दोन दिवसांपासून याची अंमलबजावणीचे आदेश असताना काहीजण नियमांकडेच दुर्लक्ष करीत आहेत.

Web Title: Punitive action against 14 shops in Dondaicha