शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विज्ञानाची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 23:12 IST

प्रा.डॉ.प्रशांत सोनार : साक्री तालुका विज्ञान प्रदर्शनाचा उत्साहात समारोप, विजेत्यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव

पिंपळनेर : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेत विज्ञानाची प्रगती सत्यात उतरविण्याचे सामर्थ्य असते, असे प्रतिपादन आॅस्ट्रेलिया येथील क्वींसलँड युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक व प्रा.डॉ. प्रशांत सोनार यांनी साक्री तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी केले.येथील सेयान इंटरनॅशनल स्कूल येथे शिक्षण विभाग पंचायत समिती साक्री, तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, व साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ तसेच इंटरनॅशनल स्कूल व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने ४१ वे साक्री तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करण्यात आले. यात साक्री तालुक्यातील बालवैज्ञानिकांनी विविध गटातून २६० उपकरणांचे सादरीकरण केले होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपकरणांची पाहणी केली व विद्यार्थ्यांकडून उपकरणांविषयी माहिती जाणून घेतली.याप्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्या विद्या पाटील, मिनाक्षी गिरी, देवयानी वाघ, पी.एम. कदम, डॉ.विवेकानंद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष दिलीप बधान, रुपेश बधान, डॉ,राजेंद्र अहिरे, बी.एस. वाणी, अनिल शिंदे, विजय बोरसे, डी.व्ही. सूर्यवंशी, सुहास सोनवणे, ए.बी. मराठे, आर.व्ही. पाटील, पी.झेड. कुवर, एस.डी. पाटील यांच्यासह विज्ञान मंडळाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.विविध मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनाविषयी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शेखर बागुल यांनी केले. सूत्रसंचालन आकाश ढोले माधुरी महाले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक रुपेश बधान यांनी केले.प्राथमिक गटातील उपकरणाचे परिक्षण विज्ञान शिक्षक नितीन सोनवणे, मुस्तफा शेख व शिक्षिका ए.व्ही. सोनवणे यांनी केले. माध्यमिक गटाचे परिक्षण डॉ.सचिन नांद्रे, एस.आर. भदाणे, ए.यु. कोठावदे, पी.एस. साळुंखे तर शैक्षणिक साहित्य गटाचे परिक्षण उमराव भदाणे व दिनेश नहीरे यांनी केले.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विविध गटातील विजेत्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

टॅग्स :Dhuleधुळे