पूजा चव्हाणच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:00+5:302021-03-04T05:08:00+5:30

निवेदनात म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मृत्यूमागे राज्याचे वनमंत्री संजय राठोड ...

Pooja Chavan's death should be thoroughly investigated | पूजा चव्हाणच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी

पूजा चव्हाणच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी

निवेदनात म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मृत्यूमागे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला दोषी असलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी सुवर्णकार समाजाच्या तथा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सूडबुद्धीने चित्रा वाघ यांच्या पतीवर बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाची नोटीस पाठवून बदनामी केली जात आहे. तरी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महिला संघटनेच्या अध्यक्षा श्रेया सोनार, ममता देवरे, तारामती वाखारकर, मीनाक्षी सोनार, सुवर्णा आहिरराव, शुभांगी सोनवणे, ऊर्मिला मोरे, सुनंदा जाधव, जयश्री देवपूरकर आदींनी केली आहे.

Web Title: Pooja Chavan's death should be thoroughly investigated