लिंक ओपन केली अन् ग्रुपवर गेले अश्लील फोटो; धुळ्यात घाबरलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 21:26 IST2025-07-08T21:22:08+5:302025-07-08T21:26:33+5:30

धुळ्यात मोबाईल हॅक झाल्यानंतर एका २० वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःला संपवले.

Pharmacy student end his life over fear of mobile hacking in Dhule | लिंक ओपन केली अन् ग्रुपवर गेले अश्लील फोटो; धुळ्यात घाबरलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला संपवले

लिंक ओपन केली अन् ग्रुपवर गेले अश्लील फोटो; धुळ्यात घाबरलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला संपवले

Dhule Crime: अनोखळी नंबरवरुन आलेली फाईल किंवा लिंक ओपन करणे हे एखाद्याच्या जीवावर उठू शकतं याचे उदाहरण धुळ्यातून समोर आलं आहे. अशाच अनोखळी नंबरवरुन आलेल्या लिंकवर क्लिक केल्यामुळे धुळ्यातील एका मुलाने आपले जीवन संपवले. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. दुसरीकडे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

शिरपूर तालुक्यातील ताजपुरी येथील २० वर्षीय बी. फार्मसीच्या विद्यार्थ्याने मोबाईल हॅक झाल्यानंतर आत्महत्या केली. आरोपींनी विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक करून काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्याच भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. किशनने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेतला आणि स्वतःला संपवले. कुटुंबियांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्रउपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

किशनला त्याच्या मोबाईल एक मेसेज आला होता ज्यामध्ये एक लिंक होती. त्या लिंकवर त्याने क्लिक केले आणि त्याच्या नंबरवरुन सगळ्या कॉन्टॅक्टसना, ग्रुपवर काही अश्लील फोटो पाठवले गेले. त्यानंतर लगेचच किशनच्या मित्राचे आणि नातेवाईकांचे फोन येऊ लागले. हे असले फोटो का पाठवले अशी विचारणा त्याच्याकडे करण्यात आली. किशनला हे समजल्यावर त्याला जबर धक्का बसला आणि तो नैराश्यात गेला आणि यातूनच त्याने टोकाचं पाऊल उचललं.

साडेतीनच्या दरम्यान, किशनला एक लिंक आली होती. ती लिंक त्याच्याकडून ओपन झाली. त्यानंतर त्याने ओटीपी देखील शेअर केला. त्याच्या मोबाईच्या माध्यमातून जेवढे ग्रुप होते त्यावर अश्लील फोटो व्हायरल झाले. गावतल्या एका मुलाने त्याला फोन करुन हा सगळा प्रकार सांगितला. किशनला त्याचा मोबाईल हॅक झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याचे मित्र त्याच्याजवळ गेले. त्यांनी घाबरु नको असं किशनला सांगितले. त्यांनी त्याच्या मोबाईलमधून व्हॉट्सअ‍ॅप डिलिट केले. मात्र त्यानंतरही फोटो व्हायरल होत होते. मग त्यांनी घराजवळ आल्यानंतर त्यांनी किशनच्या मोबाईलमधील सीमकार्ड तोडून टाकले. त्यानंतर किशनने मित्रांना मी आराम करायला जातो असं सांगितले. 

किशोरने त्याच्या वडिलांना मोबाईल हॅक झाल्याचे सांगितले होते. मात्र त्यांना यातील जास्त काही समजले नाही.त्याचे वडील शौचालयात गेल्यानंतर घरात कोणीच नसल्याचे किशनने पाहिलं. त्यानंतर त्याने आईला फोन करुन कुठे असल्याचे विचारलं. त्या पाच मिनिटांतच किशनने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली. 

Web Title: Pharmacy student end his life over fear of mobile hacking in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.