पंचायतराज लोकशाहीचा आत्मा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:03 PM2018-04-24T23:03:38+5:302018-04-24T23:03:38+5:30

धुळे जिल्हा कॉँग्रेसतर्फे आयोजित चर्चासत्र, सत्कार कार्यक्रमात हनुमंत पवार यांचे प्रतिपादन 

Panchayatas democracy's soul | पंचायतराज लोकशाहीचा आत्मा 

पंचायतराज लोकशाहीचा आत्मा 

Next
ठळक मुद्देपंचायतराज दिनानिमित्त जिल्हा कॉँग्रेसतर्फे आयोजनजिल्हाभरातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा गौरव 



लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भारतीय राज्यघटनेच्या ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. राजीव गांधी यांनी १९८९ ला मांडलेले ६४ वे घटनादुरुस्ती विधेयक तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव सरकारने १९९२ ला संसदेत मांडून सत्ता विकेंद्रीकरण करण्याचे राजीवजींचे स्वप्न साकार केले. समाजातील दलित, आदिवासी व महिलांना लोकशाहीच्या केंद्रस्थानी आणून लोकांचा सहभाग असलेली लोकशाही देशात स्थापित केली. त्याचे संपूर्ण श्रेय कॉँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारांना जाते, असे प्रतिपादन युवक कॉँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केले. 
२४ एप्रिल या पंचायतराज दिनानिमित्त कॉँग्रेस कमेटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख, जिल्हा प्रभारी अ‍ॅड.ललिता पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे, आमदार काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते, रमेश श्रीखंडे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, महानगराध्यक्ष युवराज करनकाळ, विमल बेडसे, राजेंद्र देसले, हर्षवर्धन दहिते, भगवान गर्दे, डॉ.दरबारसिंग गिरासे, विजय गजानन पाटील, किरण अहिरराव, हर्षल साळुंखे, राजेश पाटील, रावसाहेब पवार, दिलीप काकुस्ते, हिरामण बैसाणे आदी उपस्थित होते. 
सुरुवातीपासून रा.स्व. संघ व भाजपा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात आहेत. मतदानाची सक्ती, लोकप्रतिनिधींसाठी शिक्षणाची अट, पं.स. व जि.प. सदस्यांच्या अधिकारात कपात, प्रशासकीय अधिकाºयांना सर्वाधिकार, नियोजन व विकासकामे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काढून घेण्यातून आताचे फडणवीस सरकार लोकशाहीचा आत्मा मारून टाकत आहे. याविरोधात कॉँग्रेस कार्यकर्ते उभे  राहतील, असा विश्वास वक्ते पवार यांनी व्यक्त केला. 
यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, पी.बी. पाटील, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, पतंगराव कदम, अमरिशभाई पटेल, रोहिदास पाटील, डॉ.हेमंत देशमुख यांच्यासारखे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सनेर यांनी केले. 
आजी-माजी लोकप्रतिनिधींचा गौरव 
आरंभी स्व. राजीवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. पंचायतराज प्रणालीतून नेतृत्व करणाºया जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सर्वप्रथम जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, नलिनी गायकवाड, दत्तू पाडवी, प्रल्हादराव पाटील, विलास बिरारीस, मधुकर बागुल, उत्तमराव देसले, गणपत भोये, पुरुषोत्तम पाटील, लीलाधर पाटील, सुवर्णा प्रकाश पाटील, किशोर रंगराव पाटील, गायत्री जयस्वाल, पीतांबर महाले, युवराज करनकाळ, प्रकाश पाटील, गुलाब सोनवणे, रामभाऊ माणिक, डॉ.रवींद्र देशमुख, जितेंद्र गिरासे, नंदू सोनवणे, प्रभाकर बच्छाव, निर्मलाबाई बच्छाव, छोटू चौधरी, आबा मुंडे, बापू महाजन, महेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, हेमराज पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरुपात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

Web Title: Panchayatas democracy's soul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.