शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजना न केल्यास डेंग्युचा उद्रेक होऊ शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

गेल्या दोन दिवसापासून धमाणे गावातील तीन बालकांना डेंग्यू आजाराचे निदान झाल्यानंतर धुळ्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु ...

गेल्या दोन दिवसापासून धमाणे गावातील तीन बालकांना डेंग्यू आजाराचे निदान झाल्यानंतर धुळ्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. सोमवारी व मंगळवारी वैद्यकीय पथक व अधिकाऱ्यांनी गावात भेटी दिल्या. मंगळवारी धुळे जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी ए. एस.अहिरराव, कीटक समाहरक ए.वाय .परदेशी, जी.एम शेंडे,जी. एल. सूर्यवंशी, आरोग्य पर्यवेक्षक एस. पी. गोसावी, तसेच नगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विक्रम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक यु.पी.सोनव, आरोग्य सेवक यु.डी. मोरे, डी. बी.पाटील, आशा सेविका ज्योती प्रकाश पाटील, सुनिता कैलास पाटील, यांच्या पथकाने धामणे गावात घरोघरी जाऊन पाहणी केली. परिसरामध्ये डेंग्यू आजाराची लक्षणे असलेल्या संभाव्य रुग्णांची पाहणी केली. तसेच डास उत्पादक साधने, पाण्याची भांडी , हौद, डबके अशा ठिकाणी पाहणी करून ग्रामस्थांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. तर पथकाने केलेल्या पाहणीत गावात बहुतांश ठिकाणी पाण्याच्या साठा असलेल्या जागावर त्यांना डेंग्यूचा प्रसार करणारी एडीस, अनोफेलिस, क्युलेक्स जातीचे डास आढळून आले. त्या डासांचे नमुनेही पथकाने घेतले आहेत.

या पाहणीनंतर पथकाने ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक अविनाश बैसाणे, प्रतीक संजय जाधव यांना डेंग्यूच्या गावातील वाढत्या आजाराची परिस्थिती लक्षात आणून दिली.. वेळीच उपाययोजना जर का करण्यात आल्या नाहीत तर डेंग्यूचा चा उद्रेक लवकरच होऊ शकतो ही जाणीव करून दिली..

ग्रामपंचायतीने सदर डेंग्यूच्या प्रसार करण्यासाठी गावात कोरडा दिवस पाळणे, पाण्याचे साठे स्वच्छ व साफ करणे करणे, गावात धूळ फवारणी करणे, गप्पी मासे टाकने अशा सूचनाही दिल्या.

दरम्यान धमाने ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बैसाणे, लिपिक जाधव , शिपाई लगेच कामाला लागले होते . ही स्वच्छता किंवा साफसफाई ही तात्पुरती नसून कायम स्वरूपाची उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.