शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना गावात फिरु देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:30 IST

जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी दिला इशारा

धुळे : सद्या धुळे तालुक्यात वीज वितरण कंपनी थकीत विजबिलापोटी पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे सत्र सुरु केले आहे. गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांकडे पैसा नसल्यामुळे ग्रामपंचायतीकडून वसुली झालेली नाही. त्यामुळे विज कंपनीचे बिले ग्रामपंचायतींना अदा करता येऊ शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन कट करुन ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वीज कंपनी वेठीस धरीत असल्याने भाजपाचे राम भदाणे यांनी विद्युत वितरण कंपनीला विज कनेक्शन पुर्ववत करा़ अन्यथा, वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुक्यात फिरु देणार नाही असा इशारा पत्रकान्वये दिला आहे.महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांना दिलेले कोणतेच आश्वासन आतापर्यंत पाळलेले नाही. अधिवेशनात सभागृहात दिलेला शब्द देखिल या सरकारने पाळलेला नाही. ऐन उन्हाळयात तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे मोठे पाप हे सरकार करत आहे. तालुक्यात विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांच्या विज बिलासाठी ग्रामपंचायतींना अडवणूक करत असून, महाविकास आघाडी सरकार ग्रामीण जनतेची पिळवणूक करत आहे. त्याचप्रमाणे शेकºयांचे शेती विजपंपाच्या बिलासाठी देखील वितरण कंपनी अडवणूक करत आहे. त्यामुळे जनतेला या सरकारबद्दल व वीज वितरण कंपनीविषयी चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाºया सात दिवसांत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन पुर्ववत न केल्यास विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांना भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशाराच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी दिला आहे़