भरधाव ट्रकने एकाला चिरडल्याने जागीच मृत्यू; धुळेमधील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: October 4, 2022 21:48 IST2022-10-04T21:47:30+5:302022-10-04T21:48:14+5:30
अपघातामुळे एका मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

भरधाव ट्रकने एकाला चिरडल्याने जागीच मृत्यू; धुळेमधील घटना
धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकखाली अचानक एक अनोळखी व्यक्ती आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नगावबारीजवळ उड्डाणपुलावर घडली. अपघातामुळे एका मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगावबारी शिवारातील सातपुडा हायस्कूलसमोर उड्डाणपुलावर सोनगीरकडून धुळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच सोनगीर टोलनाक्यावरील सुमीत शिंदे, मनोज महाजन, थानसिंग ठाकरे, बापू पाटील, रवी नेरकर, भूषण जाधव, विकास गवळे, युवराज पारधी यांच्यासह देवपूर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. ट्रकखाली अज्ञात व्यक्ती आल्याने जागीच मृत्यू झाला. तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान, दसरा सणाच्या पुर्वसंध्येलाच अपघात घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.