शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण ट्रॅकर ॲपची अंगणवाडीसेविकांना डोकेदुखी; ॲपमध्ये सुधारणा करा : राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST

अंगणवाडी सेविकांना वापरासाठी देण्यात येणाऱ्या पोषण ट्रॅकर ॲपची तांत्रिक कारणे दूर करून झाल्यावरच हा ट्रॅकर सुरू करावा. तोपर्यंत या ...

अंगणवाडी सेविकांना वापरासाठी देण्यात येणाऱ्या पोषण ट्रॅकर ॲपची तांत्रिक कारणे दूर करून झाल्यावरच हा ट्रॅकर सुरू करावा. तोपर्यंत या पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे.

याबाबत संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी सांगितले की, याआधीचे ॲप जेमतेम वापरणाऱ्या अंगणवाडी सेविका आता कुठे पूर्ण फंक्शन शिकू लागल्या होत्या. तोवर नवीन ॲप व नवीन माहिती, तिही इंग्रजीत असल्याने जवळजवळ ८० टक्के सेविकांमध्ये या ॲपच्या वापराबाबत तांत्रिक ज्ञान नाही. कारण ॲपचा आग्रह धरण्याआधी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे होते. पोषण ट्रॅकर या ॲपचा वापर केला तरच पगार निघणार असल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजी आहे.

मे २०२० पर्यंत अंगणवाड्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती भरली जात होती; परंतु जुन्या ॲपमध्ये काही त्रुटी होत्या म्हणून नवीन ॲप विकसीत केले; परंतु या ॲपमध्ये देखील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने माहिती भरण्यासाठी पुन्हा रजिस्टर वापरण्याचे आदेश दिले. परंतु हे रजिस्टर खरेदी करण्यासाठी शासनाने निधी दिला नाही व रजिस्टरही दिले नाही. हा खर्च अंगणवाडी कार्यकर्तीला करावा लागला. आता पोषण ट्रॅकर ॲपवर काम करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत.

अंगणवाडी सेविकांना आपल्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे; परंतु अनेक सेविकांकडे स्मार्टफोन नाही तसेच अनेक जणांच्या कुटुंबांमध्ये सामूहिक फोन वापरले जातात. सध्या मुलांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने सेविकांना या ॲपवर काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या ट्रेकर्ससाठी खासगी फोन वापरला जाऊ नये तसेच शासनाने त्यांना चांगल्या क्षमतेचा नवीन मोबाईल घ्यावा व रिचार्जचे पैसेही वाढवून द्यावेत. पोषण ट्रॅकर ॲपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आधारकार्डची अट शिथिल करावी, बालकांची उंची मोजण्यासाठी इंच नव्हे तर सेंटिमीटरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युनियनने केली आहे. शासनाने या प्रश्नात त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी युनियनचे कार्याध्यक्ष अध्यक्ष युवराज बैसाने यांनी केली आहे.