शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कोरोनाचा शिरकाव झाल्याने निजामपूर-जैताणे प्रतिबंधित क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 22:58 IST

१२ जणांना केले होम क्वॉरंटाईन । नाशिक येथे उपचारासाठी गेलेल्या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : साक्री तालुक्यातील निजामपुरात अखेर कोरोनाचा शिरकाव झाल्याने निजामपूर व जैताणे ही दोन्ही गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहे. नाशिक येथे उपचारास गेलेल्या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.निजामपूर येथील चैनीरोडवरील एका तरुणाची नाशिक येथे कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे साक्रीचे नायब तहसीलदार अंगद असटकर यांनी ग्रामपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत निजामपूर आणि जैताणे ही दोन्ही गावे १४ दिवसांसाठी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशुतोष साळुंखे, डॉ.अमोल पवार, डॉ.अभिषेक देवरे, नरेंद्र धुरमेकर यांनी चैनीरोडवरील रुग्णाच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. संबंधितांची नावे घेऊन संबंधित १२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.३०० मीटरचे क्षेत्र कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून बॅरिकेट करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे दोन पथक या क्षेत्रात १४ दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार असल्याचे डॉ.अमोल पवार यांनी स्पष्ट केले.त्यानंतर साक्रीचे नायब तहसीलदार अंगद असटकर यांनी बैठकीत निजामपूर व जैताणे ही दोन्ही गावे २० जून ते ४ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली. मंगळवारी रात्रीपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल दुकाने, पंप, कृषी विषयक दुकाने, पीठ गिरणी, दूध वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे म्हटले आहे. भाजीपाला विक्री सुद्धा बंद केली आहे. हातगाडीवरून भाजीपाला विक्री देखील बंद केली आहे.मंगळवारपर्यंत येथील बँका बंद राहतील. मात्र, कृषी विषयक कर्ज आणि शासकीय व्यवहार सुरू ठेवता येतील, असे नायब तहसीलदार यांनी नमूद केले.बुधवारपासून कृषीविषयक दुकाने सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत उघडी राहतील. दूध सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत विक्री होईल. मेडिकल व दवाखाने यांना वेळेचे बंधन नाही. भाजीपाला विक्री सुरक्षित अंतराची अट ठेऊन परवानगी देऊन सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत राहणार आहे. निजामपूर येथील परवाना धारक भाजीपाला विक्रेते एस.के. नगरात ओपन स्पेसवर सकाळी ८ ते १२ वेळेत भाजी विक्री करतील.जैताणे येथील भाजीपाला विक्रेत्यांना एव्हीएम हायस्कूल ग्राउंड उपलब्ध करुन देण्याचे ठरले. मास्कशिवाय कुणीही फिरू नये. जे सुरक्षित अंतर ठेवणार नाहीत त्यांच्याविरुद्ध ग्रामपालिकेने पोलिसात तक्रार करावी. कुणीही अफवा पसरवू नका, अशा सूचना देण्यात आल्या.या बैठकीस सरपंच सलीम पठाण, ग्रामविकास अधिकारी पी.बी. मोराणे, एपीआय सचिन शिरसाठ, पंचायत समिती सदस्य सतीश राणे, माजी सरपंच अजितचंद्र शाह, माजी पं.स. सदस्य वासुदेव बदामे, जैताणे सरपंच ईश्वर न्याहाळदे, ग्रामपंचायत सदस्य परेश पाटील, जाकीर तांबोळी, मंडळ अधिकारी व्ही.व्ही. बावा, तलाठी प्रशांत माळी, तलाठी रोझकर, तलाठी साळुंखे, युसूफ सैय्यद, भैय्या गुरव, त्रिलोक दवे, प्रवीण शाह, सागर शिंपी, ताहीर मिर्झा, परवेज सैय्यद आदींची उपस्थिती होती.निजामपूर गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे वृत्त समजले. तरी शासकीय यंत्रणा गंभीर नसल्याची संतप्त प्रतिक्रिया युसूफ सैय्यद यांनी सभागृहात वारंवार बोलून दाखविली.सोमवारपासून निजामपूर, जैताणे येथे दूरदूरच्या गावाहून लग्न बस्त्यासाठी, कैऱ्या घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी लोकांची गर्दी होत होती. त्यावेळी कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत होती. याबाबत आपण प्रशासनास दररोज माहिती देत होतो. पण कुणीही लक्ष दिले नाही. मग परिणाम काय आला, असा सवालही त्यांनी केला.ग्रामपालिकेने मंगळवारपासून निर्णय घेऊन स्वत:हून लॉकडाऊन जाहीर केले होते. दोन दिवसांनी लोकांनी त्याचे गांभीर्य लक्षात न घेता नियम झुगारले. तर काहींनी शिव्या दिल्याचे ग्रामविकास अधिकारी मोराणे यांनी सांगितले. अखेर निजामपूरात कोरोनाचा शिरकाव झाला. रुग्ण आढळला, सर्व गाव बंद झाले. आता कोणाला सांगणार, असा प्रतिसवालही त्यांनी केला.

टॅग्स :Dhuleधुळे