शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नवादेवी धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST

बोराडी (ता. शिरपूर): सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या नवादेवी पाडा गावाची वस्ती आहे. या पाड्यापासूनच २०० मीटर ...

बोराडी (ता. शिरपूर): सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या नवादेवी पाडा गावाची वस्ती आहे. या पाड्यापासूनच २०० मीटर अंतरावर असलेला नवादेवी धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.

सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. सातपुडा डोंगररांगांतून येणाऱ्या पाण्याच्या

सरींमुळे विविध ठिकाणी धबधबासदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. तालुक्‍याच्या पर्यटनात नवादेवी, धाबादेवी हे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. वन पर्यटनाने समृद्ध हे ठिकाण असल्याने येथे गर्दी होत आहे. बोराडीपासून १० किलोमीटर अंतरावर (ता. शिरपूर) कोडीद येथील नवादेवी धबधबा हा पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून उपलब्ध आहे. धुळे आणि जळगाव, नंदुरबार परिसरातील पर्यटक सध्या एकदिवसीय पर्यटनासाठी ‘नवादेवी’ धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

नवादेवी परिसर हा पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर आहे. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसामुळे सातपुडा परिसर हिरवाईने नटलेला आहे. नवादेवी धबधब्याखाली भिजण्याचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटत आहेत.

‘नवादेवी’ धबधबा सध्या येथे सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण दिसत आहे. शनिवार आणि रविवारी या सुटीच्या दिवशी मोठी गर्दी होताना दिसत आहे. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांचे पाय आपोआप नवादेवी धबधब्याकडे वळतात. या धबधब्यापर्यंत सुरक्षित जायला आणि निसर्गरम्य पर्यटनाची माहिती द्यायला स्थानिक नागरिकांची मदत मिळत आहे. शासनाने या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचा विकास केला तर नक्कीच या भागातील आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळेल. या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचा विकास करण्याची गरज आहे.