राष्ट्रीय निबंध स्पर्धेत झेड.बी. पाटील महाविद्यालयाची प्रेरणा वाधवानी तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST2021-03-13T05:04:47+5:302021-03-13T05:04:47+5:30

प्रेरणा वाधवानी या विद्यार्थिनीने ‘असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्स’ आयोजित राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत तृतीय पारितोषिकाचा बहुमान मिळवून ...

In the National Essay Competition, Z.B. Wadhwani III is the inspiration of Patil College | राष्ट्रीय निबंध स्पर्धेत झेड.बी. पाटील महाविद्यालयाची प्रेरणा वाधवानी तृतीय

राष्ट्रीय निबंध स्पर्धेत झेड.बी. पाटील महाविद्यालयाची प्रेरणा वाधवानी तृतीय

प्रेरणा वाधवानी या विद्यार्थिनीने ‘असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्स’ आयोजित राष्ट्रीय निबंध लेखन स्पर्धेत तृतीय पारितोषिकाचा बहुमान मिळवून जयहिंद संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

ही स्पर्धा २०१९ मध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतली होती. नुकताच त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रेरणा ही कला शाखेतील विद्यार्थ्यांनी असून हिने पिरीओडिक टेबलचा अभ्यास करून त्यावर निबंध सादर केला होता.

या यशाबद्दल तिचे संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंके, व्हा.चेअरमन प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा.सुधीर पाटील, आदीनी कौतुक केले. तिला प्रा.एन.एन. पाटील, प्रा.प्रीतम चौक, प्रा.शीतल पाटील, प्रा.मनीषा पाटील, प्रा.राजेश्वर कापडे व डॉ.अनितादेवी पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: In the National Essay Competition, Z.B. Wadhwani III is the inspiration of Patil College