शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

शुभारंभाच्या साखळी सामन्यात मुकूंद ज्वेलर्सचा संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 22:37 IST

टी-२० क्रिकेट स्पर्धाचा दुसरा सामना बरोबरीत

शिरपूर : १७ वर्षे आतील साखळी क्रिकेट सामन्यात धुळे येथील मुकूंद ज्वेलर्सचा संघाने एकतर्फी विजय मिळविला तर दुसरा सामना बरोबरीत झाल्यामुळे सुपर ओव्हरमध्ये ००० संघ विजेता ठरला़२४ रोजी तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूलच्या मैदानावर एस.व्ही.के.एम. टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभ झाला़ यावेळी श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच नवीन शेट्टी (मुंबई क्रिकेट असोसिएशनचे २०१३ ते २०१९ कालावधीतील मॅनेजमेंट कमिटी मेंबर व चेअरमन मार्केटिंग कमिटी मेंबर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.शुभारंभाचा सामना एसव्हीकेएम रॉयल संघाविरोधात धुळे येथील मुकूंद ज्वेलर्स या संघात झाला़ नाणेफेक जिंकत एसव्हीकेएम रॉयल संघाने फलदांजी स्विकारली़ २० षटकांच्या सामन्यात ८ गडीबाद ११६ धावा केल्यात़ त्यात संघाचा कर्णधार संम्येक जगताप याने २ चौकार व २ षटकांच्या मदतीने सर्वाधिक २७ धावा करून गडीबाद झाला़ पहिल्याच षटकात २ चौकार मारून जोरदार सुरूवात केली़ मात्र त्यानंतर हा संघ गडगडला़ अनुराग सोनवणे १५ व मयुरेश पवार याने ११ धावा केल्यात़ मुकूंद ज्वेलर्सच्या संघाच्यावतीने रोहित साळवे याने ४ षटकात १७ धावा देत ४ गडीबाद केल्यामुळे एसव्हीकेएम रॉयल संघाला धावा कमी करण्यास रोखले़प्रत्युत्तरात, मुकूंद ज्वेलर्सच्या संघाच्यावतीने जेहान शेख याने ५ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ३३ धावा करून बाद झाला़ त्यानंतर कर्णधार प्रतिक सोनवणे याने १७ धावांमध्ये १ चौकार व ४ षटकाच्या मदतीने ३३ धावा केल्यात तर अनुराग वाघ याने देखील सर्वाधिक ३८ धावा करून संघाला १३ षटकातच विजयी केले़ विजयी चौकार मारत १३़२ षटकात १ गडीबाद देवून १२१ धावा करून संघाला विजयी केले़ रॉयल संघाच्यावतीने निखील राजपूत याने ३ षटकात १ गडीबाद केला़दुसरा साखळी सामना येथील आऱसी़पटेल फॉर्मसी मैदानावर झाला़ त्यात यज्ञ अबॅकस क्लासेस धुळे विरोधात सारथी फायटर्स धुळे यांच्यात झाला़ सारथी संघाने २० षटकात ७ गडीबाद १३३ तर अबॅकस संघाने १० गडीबाद करून १३३ धावा केल्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला़ मात्र सुपर ओव्हरमध्ये अबॅकस संघ विजेता झाला़सर्व साखळी सामने तांडे येथील मुकेशभाई आर.पटेल सीबीएसई स्कूलच्या मैदानावर व येथील आऱसी़पटेल फॉर्मसी मैदानावर होणार आहेत़ २७ रोजी दुपारून उपांत्य सामने तर २८ रोजी दुपारी १२ वाजता अंतीम सामना तांडे येथील मैदानावर होणार आहे़