शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसायास लॉकडाऊनच्या नियमातून सूट देण्याची आमदार कुणाल पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST

धुळे- कोरोना साथरोगाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊनच्या नियमात संध्याकाळच्या दूध विक्रीला बंदी घातल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ...

धुळे- कोरोना साथरोगाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊनच्या नियमात संध्याकाळच्या दूध विक्रीला बंदी घातल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे दूध विक्री व वाटपासाठी लॉकडाऊनच्या नियमातून सूट देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्यासह देशात कोरोना साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी शासनाने कठोर नियम व अटींसह कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यात दुग्ध व्यवसायासाठी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात दूध विक्रीला संध्याकाळी बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षभरापासून शेतकरी, छोटे व्यावसायिक यांच्यासह सर्व घटकांना नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान शेतकऱ्याला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय हा मुख्य जोड धंदा आहे. दुधाच्या व्यवसायावरच शेतकऱ्यांची आठवड्याची व महिन्याची आर्थिक घडी अवलंबून असते. दरम्यान दूध उत्पादनासाठी महागडी जनावरे, चारा, ढेप तसेच औषधोपचार आणि मनुष्यबळ यासाठी प्रचंड खर्च येत असतो. हा सर्व खर्च वजा करून शेतकरी आपला चरितार्थ भागवत असतो. मात्र लॉकडाऊनच्या नियमात संध्याकाळी दूध विक्रीला बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ग्रामीण भागातून दुधाचे संकलन करून असंख्य शेतकरी शहरात दूध विक्रीसाठी दररोज सकाळ व संध्याकाळ या दोन वेळेत येत असतात. मात्र लॉकडाऊनच्या नियमात संध्याकाळी दूध विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हजारो लीटर दुधाचे नुकसान होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दूध विक्रीचे सकाळचे नियम जैसे थे ठेवत शहरात दूध विक्रीसाठी लॉकडाऊनच्या नियमत सूट देत संध्याकाळी ६ ते ८वाजे दरम्यान कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे नियम पाळत दूध पोहच विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे.