शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ची ४ रोजी स्थायी समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:07 IST

उन्हाळा लागताच उसाच्या रसाला मागणी धुळे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली ...

उन्हाळा लागताच उसाच्या रसाला मागणी

धुळे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुपारी उन्हाचे चांगलेच चटके लागत असतात. उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरासह ग्रामीण भागातही उसाच्या रसाला मोठी मागणी वाढली आहे. महामार्गावरही अनेकांनी रसवंत्या थाटलेल्या आहेत. यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.

न्याहळोद उपरसपंचपदी योगराज पवार बिनविरोध

न्याहळोद : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगराज पवार यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच ज्योती भील व ग्रामसेवक किशोर शिंदे यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी १५ पैकी ९ सदस्य हजर होते. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

वीज बिल भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा द्यावी

धुळे : गेल्यावर्षी लॅाकडाऊनमुळे अनेकांनी वीज बिले भरलेली नाहीत. त्यामुळे अनेक ग्राहकांकडे वीज बिलाची थकीत रक्कम वाढली. बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. ग्राहकांना दोन-तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा देण्याची मागणी होत आहे.

रात्री नऊ वाजताच होऊ लागले दुकाने बंद

धुळे : शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने काही नियम घालून दिले असून, रात्री ९ पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार शहरातील अनेक भागात रात्री ९ वाजताच सर्व दुकाने बंद होत असतात. याकडे पोलीस लक्ष ठेवून आहेत.

व्यावसायिकांनाही मास्क बंधनकारक करावा

धुळे : शहरात अनेक व्यावसायिक रस्त्यालगत हातगाड्या लावून किरकोळ व्यवसाय करीत असतात. मात्र यातील बहुतांश विक्रेते हे मास्क लावतच नसल्याचे दिसून येते. त्यांच्यामुळे हातगाडीवर येणाऱ्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्यांनाही मास्क बंधनकारक करण्यात यावा, अशी मागणी आहे.

आदिवासी भागात भोंगऱ्याची चाहूल नाही

शिरपूर : दरवर्षी होळीच्या तीन आठवडे अगोदरपासून आदिवासी भागात भोंगऱ्या बाजाराची तयारी केली जाते. समाजबांधव मोठमोठे ढोल वाजवित नृत्याचा सराव करतात. मात्र यावर्षी कोरानामुळे आदिवासी भागात भोंगऱ्याची कुठलीही चाहूल दिसून येत नाही.

नाशिकसाठी शिवशाही बस सुरू करावी

धुळे : महामंडळाच्या धुळे आगारातर्फे कोरोनापूर्वी नाशिक-धुळे या मार्गावर शिवशाही बस सुरू केली होती. या वातानुकूलित बस सेवेला प्रतिसाद मिळत होता. मात्र सध्या ही बस बंद असून, ती पूर्ववत सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.