दहशतवादी हल्यातील शहिदांना धुळे जिल्ह्यात आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:37 IST2019-11-27T13:36:57+5:302019-11-27T13:37:15+5:30
‘एक दिवा शहिदांसाठी’ कार्यक्रम, मेणबत्ती पेटवून शहिदांच्या आठवणींना दिला उजाळा

दहशतवादी हल्यातील शहिदांना धुळे जिल्ह्यात आदरांजली
आॅनलाइन लोकमत
धुळे : मुंबई येथे ११ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धुळ्यात ‘एक दिवा शहीदांसाठी’हा उपक्रम राबविण्यात आला.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्यात नागरिकांसह अनेकजण शहीद झाले होते. या शहीद जवांनाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
धुळे
मनुश्री प्रतिष्ठान व धुळे जिल्हा खान्देश विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील बाफना हायस्कूलजवळ ‘एक दिवा शहीदांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मेणबत्ती पेटवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील, सुनील देवरे, प्रकाश बाविस्कर, डॉ. संजय सोनवणे, अतुल सोनवणे, कल्पना वाघ, जयश्री शहा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरपूर
येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य पी.व्ही.पाटील, पर्यवेक्षक प्रदीप पाटील, एस.आर. देसले उपस्थित होते़
तसेच एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ़एस़एऩ पटेल, कुलसचिव रोहित रंधे, उपप्राचार्य डॉ़महेंद्र पाटील, उपप्राचार्य दिनेश पाटील, आदी उपस्थित होते.
कोडीद(ता.शिरपूर)
येथे २६/११ च्या आंतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व मृत्यू पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी डॉ.हिरा पावरा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पावरा, पोलीस पाटील भरत पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, नटराज पावरा, कनवर पावरा, कांतीलाल पावरा, मुकेश ईशी, प्रमोद इशी, किरण डिवरे, अशोक पावरा, राजू सोनवणे, सनी पावरा यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.