शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्ये आढळले तब्बल ९ हजार रुग्ण, २८ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:36 IST

धुळे - जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. मार्च महिन्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. आतापर्यंत ...

धुळे - जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु झाला आहे. मार्च महिन्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. आतापर्यंत मार्चमध्ये तब्बल ९ हजार २७४ रुग्ण आढळले आहेत. २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मार्च महिन्यात ९ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर एका महिन्यात आढळलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यापूर्वी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मात्र मार्च महिन्यात आतापर्यंतचे रुग्णवाढीचे सर्व विक्रम मोडले आहेत. कोविड रुग्णालय व कोविड केअर केंद्रातील ऑक्सिजन बेड कमी पडू लागले आहेत. कोविड केअर केंद्रातील बेड वाढवण्यात येत आहेत. तसेच कोरोनाची साखळी तुटावी यासाठी ५६ तासांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र काही नागरिक अजूनही बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. त्यामुळेच रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

९ हजार २७४ रुग्ण आढळले -

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १५ हजार ७४९ इतकी होती. १ मार्च ते २९ मार्च या कालावधीत ९ हजार २७४ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार २३ इतकी झाली आहे. तर या कालावधीत ६ हजार ११२ रुग्ण बरे झाले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ हजार ६१६ होती. तर २९ मार्चपर्यंत २० हजार ७२८ रुग्ण बरे झाले आहेत.

धुळे शहरातील १२ तर ग्रामीण मधील १६ मृत्यू -

मार्च महिन्यात रुग्ण संख्येबरोबरच मृतांचीही संख्या वाढली आहे. एकूण २८ कोरोना बाधित रुग्णांचा महिनाभरात मृत्यू झाला. त्यात धुळे शहरातील १२ तर ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४२० रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. त्यात, धुळे शहरातील १८६ तर उर्वरित जिल्ह्यातील २३४ रुग्णांचा समावेश आहे.