लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते कोरोनामुळे अनेक मुलींना जाता आले नाही माहेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:35 AM2021-05-16T04:35:18+5:302021-05-16T04:35:18+5:30

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेक मुलींना आपल्या माहेरी जात आलेले नाही. दिवाळीलाही मुलांना मामाच्या गावाला जाता आले ...

Many girls could not go to Maheri because of my mother-in-law Nandate Corona for Leki's Maheri | लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते कोरोनामुळे अनेक मुलींना जाता आले नाही माहेरी

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते कोरोनामुळे अनेक मुलींना जाता आले नाही माहेरी

Next

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेक मुलींना आपल्या माहेरी जात आलेले नाही. दिवाळीलाही मुलांना मामाच्या गावाला जाता आले नाही. अक्षय्य तृतीया अर्थात आखाजीला मुली माहेरी जाण्याची मोठी परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे अनेक मुलींना माहेरीही जाता आलेले नाही.

माझं माहेर माहेर -

माझं माहेर धुळे तालुक्यातच आहे. मागील वर्षभरापासून माहेरी जाता आले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुलं लहान असल्यामुळे माहेरी गेलो नाही. मुलांनाही मामाकडे जायची ओढ लागली आहे.

- पल्लवी वाघ, धुळे

आई-वडील धुळे शहरातच वास्तव्याला आहेत. पण भाऊ नोकरीनिमित्ताने विदेशात आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने एका वर्षांपासून त्याला धुळ्यात येता आलेले नाही. त्यामुळे दिवाळी व अक्षय्य तृतीयेलाही भावाची भेट झाली नाही.

- स्मिता चौधरी, धुळे

आई-वडील चाळीसगाव येथे राहतात. रक्षाबंधनावेळी भाऊ भेटण्यासाठी आला होता. पण आई-वडिलांची वर्षभरापासून भेट झालेली नाही. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर माहेरी जायचे ठरवले आहे.

- प्रियांका पाटील, धुळे

लागली लेकीची ओढ -

मागील एका वर्षापासून मुलगी माहेरी आलेली नाही. मुलगी मुंबईला राहते. तिथे कोरोनाचा संसर्ग जास्त असल्याने आम्हाला कोरोनाचा धोका होऊ नये म्हणून माहेरी येण्याचे टाळते आहे.

- अंजना सोनवणे, धुळे

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बहिणीची भेट झालेली नाही. तिला भेटण्यासाठी जीव कासावीस झाला आहे. मात्र आरोग्य क्षेत्रात काम करत असल्याने सुरक्षितता म्हणून तिला भेटायचे टाळले आहे.

- प्रतिभा घोडके, धुळे

कोरोनाने अनेक नाते दूर केले आहेत. मुलीला माहेरी येण्यापासून रोखले आहे. कधी कोरोना कमी होतो. अचानक वाढतो. तर कधी गाड्याच बंद असतात, त्यामुळे मुलीला माहेरी येता आले नाही. मुलीची व नातवंडांची खूप आठवण येते.

- सुमित्रा बाविस्कर, धुळे

मामाच्या गावाला जायला कधी मिळणार -

मामाच्या गावाला जायची इच्छा आहे. पण कोरोना संपल्यानंतर गावाला जाऊ असे आई सांगते. शाळा बंद असल्याने घरी राहून कंटाळा आला आहे. सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाते तेव्हा जास्त मजा येते.

- डॉली वाघ, धुळे

आखाजीला मामाच्या गावाला जायचे होते. पण तिकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने जायचे रद्द केले. दिवाळीलासुद्धा मामाच्या गावाला गेलेलो नव्हतो.

- स्वामी मराठे, धुळे

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. तसेच बाहेर खेळायला जाणेही बंद झाले आहे. घरातच राहून कंटाळा आला आहे. आखाजीला मामाच्या गावाला जाता आले नाही. पण मामा लवकरच घ्यायला येणार आहे.

- साक्षी पाटील, धुळे

Web Title: Many girls could not go to Maheri because of my mother-in-law Nandate Corona for Leki's Maheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.