शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणी मदतीपासून वंचित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

धुळे जिल्ह्यात घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई, स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी जिल्ह्यात घरेलू काम ...

धुळे जिल्ह्यात घरभांडी, कपडे धुणे, फरशी साफसफाई, स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी जिल्ह्यात घरेलू काम करणाऱ्या महिलांची संघटना कार्यरत होती. त्यांच्यामार्फत या मोलकरणी महिलांची सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नोंदणी केली जायची. मात्र २०१७ पासून नोंदणीच बंद आहे. २०१७ पर्यंत जिल्ह्यात ९ हजार १५८ घरेलू कामगार महिलांची नोंदणी होती.

नोंदणी केल्यानंतर दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे असते. मात्र, याकडे घरकाम करणाऱ्या महिलांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणे कठीणच आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे. घराबाहेर निघण्यास निर्बंध घातलेले आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या बहुतांश महिलांचे काम बंद झाल्याने, त्यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. अशांना मदत करण्याच्या हेतूने राज्य सरकारने नोंदणीकृत महिलांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. २०१७ पासूनच नोंदणी बंद असल्याने, आता किती महिलांना याचा लाभ मिळू शकेल हे आज सांगणे कठीण आहे.

मोलकरणीची नोंदच नाही

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे घरकामगार महिलांची नोंद केली जाते. त्यांच्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. मात्र, गेल्या २०१७ पासून घरकामगार महिलांची नोंदणीच झाली नसल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. प्रशासनाकडूनही जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक महिला घरकाम करूनही त्यांची नोंद सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडे करत नाहीत.

नूतनीकरणासाठी उशीर

२०१७-१८ पर्यंत ज्या महिलांची नोंदणी झालेली होती, त्यानंतर नूतनीकरणासाठी एक-दीड वर्षांनी येऊ लागल्या. त्यामुळे त्यांची नूतनीकरणाची मुदत संपून गेली. अनेकांनी नोंदणीकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ कार्यालयाकडून नोंदणी संदर्भात विचारणाही झालेली नाही. त्यामुळे आज जिल्ह्यातील मोलकरणींना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

शासनाने संचारबंदीच्या काळात मदत देण्याच्या हेतूने घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र, अनेक वर्षांपासून आमची नोंदणीच झालेली नाही. त्यामुळे शासनाने मदत जाहीर केलेली असली तरी ती मिळेल की नाही याची शंकाच आहे. शासनाने नोंदणी ग्राह्य न धरता सरसकट मदत करावी.

-आशाबाई सोनवणे

धुणी-भांडी करूनच माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह होत असतो. आता शासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. तसेच कोरोनाच्या भीतीने काही घरांचे कामही बंद झालेले आहे. अशा स्थितीत शासनाने मदत जाहीर केली. मात्र माझी सरकारी कार्यालयात नोंदणीच झालेली नाही. त्यामुळे मला मदतीपासून वंचित राहावे लागले.

- द्वारकाबाई भिल