शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजुरांना लॉकडाउन शिथीलची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 21:57 IST

शासनाच्या शिबिरांचा मोठा आधार : तमाशा कलावंतांना दिले मुळ मालकाच्या ताब्यात, मुक्काम पुन्हा मोहाडीला

धुळे : येथील अग्रवाल विश्राम भवनात महानगरपालिकेने सुरू केलेल्या कॅम्पमधील स्थलांतरीत मजुरांना लॉकडाउन शिथील होण्याची प्रतिक्षा लागली आहे़ दरम्यान या कॅम्पमध्ये एकूण ३७ नागरीकांपैकी २४ नागरीक थांबले आहेत़ तमाशा कलावंत पुन्हा मोहाडीतील आपल्या वसाहतीमध्ये परत गेले आहेत़येथील मजुरांच्या निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने शिक्षण मंडळाचे लेखाधिकारी राजेश रमेश गायकवाड यांच्यावर सोपवली होती़ सुरूवातील त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पदरमोड करुन स्थलांतरीत मजुरांसाठी चहा नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली़दरम्यान, निराधार आणि हातावर पोट असणाºया शहरातील मजुरांना दोन वेळचे जेवण पुरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी अग्रवाल भवानात मोठ्या प्रमाणावर भोजन तयार करण्याचे काम सुरू केले़ त्यामुळे भवनातील स्थलांतरीत मजुरांची देखील दररोजच्या जेवणाची सोय झाली़ शिवाय काही दानशूर लोकांकडून चहा नाश्त्याची सुविधा होत असते़ आवश्यकता भासली तर आम्ही स्वत: सेवा म्हणून चहानाश्ता देतो, अशी माहिती राजेश गायकवाड यांनी दिली़तमाशा कलावंतांची फरफटअग्रवाल विश्राम भवनात सुरूवातीला एकूण ३७ स्थलांतरीत मजुर होते़ त्यात १७ तमाशा कलावंतांचा समावेश होता़ लॉकडाउनमुळे सर्व यात्रोत्सव रद्द झाले आणि सुपाºयाही रद्द झाल्या़ त्यामुळे तमाशा कलावंतांसह मालकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे़ मोहाडीतील वसाहतीमध्ये थांबलेल्या या कलावंतांची परवड होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यावर प्रशासनाने या कलावंतांना निवारा गृहात आणले होते़ परंतु हे कलावंत पुन्हा आपल्या मुळे मालकाकडे मोहाडी येथे आपल्या वसाहतीमध्ये परत गेले आहेत़ त्यात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली येथील तमाशा कलावंतांचा समावेश आहे़ त्यातील एक महिला आणि तीन पुरूष कॅम्पमध्येच थांबले आहेत़अग्रवाल भवनातील कॅम्पमध्ये आता २४ स्थलांतरीत मजुर थांबले आहेत़ प्रशासनाकडून आणि महानगरपालिकेकडून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे़ वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे़ अन्नपाण्यावाचुन हाल होणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे़स्थलांतरीत मजुरांची चांगली सोय असली तरी त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे़ लॉकडाउन कधी शिथील होईल याची ते चातकाप्रमाणे प्रतिक्षा करीत आहेत़ परंतु देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे़ शेजारच्या मालेगाव आणि सेंधव्यातही रुग्ण आढळून आले आहेत़ शिवाय लॉकडाउन वाढविण्याचे संकेत शासनाने दिले आहेत़ त्यामुळे या स्थलांतरीत मजुरांना पुढील आदेशापर्यंत शासनाच्या कॅम्पचा आधार घ्यावा लागणार आहे़सर्व स्थलांतरीत नागरीकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत़ हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करुन वेळोवेळी स्वच्छता पाळली जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे