शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

तापीत उडी घेऊन संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:02 IST

बाळदे येथील शेतकरी । शेतीत उत्पन्न न येणे व कर्जबाजारीपणाला कंटाळला होता

शिरपूर : तालुक्यातील बाळदे येथील ५० वर्षीय एका शेतकऱ्याने बँकेतून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडता आल्यामुळे तसेच शेतीत उत्पन्न न आल्यामुळे या त्रासाला कंटाळून गिधाडे तापी पूलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली़२८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ बाळदे येथील दिलीप हिलाल पाटील यांनी शेतीकामासाठी बँकेतून कर्ज घेतले होते़ तसेच गतवर्षी अति पावसामुळे कपाशीचे पिक वाया गेले, झालेला खर्च सुध्दा निघाला नाही़ या त्रासाला कंटाळून त्यांनी स्वत:ची दुचाकी गाडी घेवून ते गिधाडे तापी पूलावर गेलेत़ बाजूला गाडी उभी करून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली़पूलावरून ये-जा करणाऱ्यांनी सदरची घटना गिधाडे गावात सांगितली़ त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पूलावर जावून गाडी कुणाची आहे याची खात्री केली असता ती गाडी बाळदे येथील असल्याचे निष्पन्न झाले़त्यानंतर सावळदे येथील पट्टीचे पोहणाºयांना बोलावून नदी पात्रात शोध घेतल्यानंतर दिलीप पाटील यांचे शव मिळून आले़ शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़मयत शेतकरी दिलीप पाटील यांना एकलुता मुलगा आहे़ २२ वर्षीय असलेला हा तरुण एका ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी काम करतो़ सततची नापिकी आणि अवकाळी पावसामुळे हातचे पीक गेल्याने वैफल्यग्रस्त असलेल्या या शेतकºयाने तापी नदीत स्वत:ला अर्पण करुन टाकल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरु होती़ तसेच या शेतकºयाला दोन मुली असून त्यांचे विवाह झाले आहेत़अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाळदे गावावर एकप्रकारे शोककळा पसरली आहे़ मयत शेतकºयाच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे़वाघाडी येथे एकाचा मृत्युवाघाडी येथील २१ वर्षीय अर्जून ज्योतीलाल कोळी याने २७ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली़ मयत अवस्थेत येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे