पक्षप्रवेशासाठी आता नेत्यांना ‘फिल्टर पॉलिसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:10 PM2019-08-23T13:10:23+5:302019-08-23T13:10:39+5:30

मुख्यमंत्री : धुळे येथे पत्रपरिषदेतील माहिती 

Leaders now have a 'filter policy' for party entry | पक्षप्रवेशासाठी आता नेत्यांना ‘फिल्टर पॉलिसी’

पक्षप्रवेशासाठी आता नेत्यांना ‘फिल्टर पॉलिसी’

googlenewsNext

धुळे : भाजपत इतर पक्षांमधून मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांसाठी अद्याप प्रवेशासाठी मोकळीक आहे; परंतु आता नेते जास्त व आमच्या जागा कमी आहेत. त्यामुळे नेत्यांसाठी आता ‘फिल्टर पॉलिसी’ अवलंबली जाणार असून स्कॅनिंगनंतरच यापुढे त्यांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. 
महाजनादेश यात्रेच्या दुसºया टप्प्यास गुरूवारी धुळे येथून सुरूवात झाली. पहिल्या दिवशी धुळ्यात रोड शो, संध्याकाळी दोंडाईचा तर रात्री नंदुरबार येथे जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री येथे मुक्कामी होते. दुसºया दिवशी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी  पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. 
महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्हे झाले. त्याचवेळीराज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाल्याने यात्रा स्थगित केली. मात्र पूरस्थिती निवळली असून यात्रेचा दुसरा टप्पा धुळ्यातून सुरू केला. आतापर्यंत जवळपास ४३ मतदारसंघात पोहचलो असून या टप्प्यात उत्तर महाराष्टÑ, मराठवाडा व विदर्भातील राहिलेला एक जिल्हा करून सोलापूरला दुसरा टप्पा संपेल.  तर तिसरा व अंतिम टप्पा १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत प.महाराष्टÑ ते कोकण (उर्वरीत भाग) असा राहील, असे ते म्हणाले. आमच्यासोबत इतर पक्षांमध्येही यात्रेचा उत्साह संचारला असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे ते उपरोधाने म्हणाले. यात्रेची परंपरा भाजपची असून विरोधात असताना संघर्षाची तर सत्तेत असताना संवादाची ही यात्रा आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समस्या व अपेक्षाही असून त्या हे सरकारच पूर्ण करू शकते, असा विश्वास असल्यानेच यात्रेला हा प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे जबाबदारीही वाढली असून पुन्हा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आणून गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काम करू, असे त्यांनी सांगितले. 
यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथे काय केले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. आम्ही सत्तेवर येण्याआधी इतर राज्ये विकासात पुढ होती. मात्र युती शासन आल्यानंतर आज कोणत्याही क्षेत्रात राज्याचा पहिल्या तीनमध्ये क्रमांक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
धुळ्यासह खान्देशातील प्रकल्पांना चालना दिली असून योग्य वेळेत ते पूर्ण होतील. त्यामुळे दुष्काळ व सिंंचनाच्या समस्या दूर होतील. त्यात त्यांनी धुळ्यासाठी अक्कलपाडा पाणी योजना, सुलवाडे-जामफळ योजना व मेगा रिचार्ज प्रकल्पाचा उल्लेख केला. 
कनेक्टिव्हीटीअभावी धुळे जिल्ह्याचा विकास व प्रगती थांबलेली होती, तिला मनमाड-इंदूर रेल्वे  मार्गामुळे कनेक्टिव्हीटी मिळणार असून प्रगतीला चालना मिळेल, असा आशावादही  मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 
धुळे महापालिकेला येत्या १५ दिवसांत चांगले व ‘टिकावू’ आयुक्त मिळतील, तसेच महापुरामुळे अतिक्रमण व अवरोधांचे आॅडिट करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी अन्य प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.  
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, सुजितसिंग ठाकूर आदी यावेळी  उपस्थित होते. +

Web Title: Leaders now have a 'filter policy' for party entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे