शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मोगलाईसह शहरात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:40 IST

धुळे : येथील साक्री रोडवरील मोगलाई भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून घाण साचल्याने ...

धुळे : येथील साक्री रोडवरील मोगलाई भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून घाण साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.

मोगलाईतील जुन्या पोलीस चौकीजवळ मोकळ्या जागेत महानगरपालिकेने मोठ्या कचरा कुंडीची व्यवस्था केली आहे. परिसरातील नागरिक याठिकाणी कचरा टाकतात. परंतु कचरा कुंडीतील कचरा अनेक दिवसांपासून काढलेला नाही. कचरा ओव्हरफ्लो होत आहे, त्यामुळे कचराकुंडीच्या चौफेर घाण साचलेली आहे. या घाणीत सातत्याने मोकाट डुकरांचा वावर आहे. परिसरात नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. घंटागाडीदेखील नियमित येत नाही. सफाई कर्मचारीदेखील फिरकत नाहीत. महानगरपालिकेचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

तसेच संतोषी माता चौकाकडून गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंध शाळेच्या समोर असोल्या कचराकुंडीचीदेखील तीच परिस्थिती आहे. ओला आणि सुका कचरा कुंडीतून बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी खासगी रुग्णालये, मोठ्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तरी देखील घाण साचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कचरा आणि स्वच्छतेचा प्रश्न केवळ मोगलाई, साक्री रोड आणि गणपती मंदिर रोडापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरात परिस्थिती वाईट आहे. कोरोनाच्या काळात घंटागाडीवर काम करणारे वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर तसेच नियमित वेतन न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या कारणामुळे घंटागाड्यांच्या फेऱ्या देखील कमी झाल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाड्या येत नसल्याने घरोघरी कचरा पडून असतो. दुर्गंधी येऊ लागली की सदरचा कचरा शहरातील कचराकुंड्यांमध्ये टाकला जातो. घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा कुंड्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कचरा कुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत.

कोरोनाच्या संसर्गात स्वच्छता राखण्याचे आवाहन करणाऱ्या महानगरपालिकेला मात्र स्वत:च्या जबाबदाऱ्यांचा विसर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.