शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशचे ग्रामदैवत कानुमातेची आज होणार स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 11:58 IST

संडे अँकर । उत्सवाची घरोघरी जय्यत तयारी, सर्वत्र उत्साहाचे वातावरण, दुसºया दिवशी होणार विसर्जन

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे/ हातनुर  : खान्देशातील ग्रामदैवत  कानुबाईचा सण उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो. रविवारी कानुबाईचे  आगमन होणार आहे. तर सोमवारी (५ आॅगस्ट) कानुमातेचे वाजत-गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसºया रविवारी कानुमातेचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात असतो. मात्र यावर्षी दुसºया रविवारी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी रोटांचा नवैद्य चढविणे योग्य ठरणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. तर तिसºया रविवारनंतर पौर्णिका आहे. त्यामुळे तेव्हाही शक्य होणार नसल्याचे अनेकजण श्रावण महिन्यातील पहिल्याच रविवारी हा सण साजरा करणार आहेत. असे असले तरी काहीजण मात्र श्रावण महिन्यातील दुसºया रविवारीही हा सण साजरा करण्याच्या मानसिकतेत आहेत. चौरंगावर कानुमातेची स्थापना केली जाते. त्यासाठी केळीचे खांब, विड्याचे पान, सुपारी, नारळ, ओटी आदी साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी झालेली होती. देवीसमोर पाच फळांचे नवैद्य ठेवण्यात येत असते. त्यामुळे विविध फळांनाही मागणी होती. भडणे गावात झाली बैठकदरम्यान शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे कानुमाता उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच गिरीश पाटील, उपसरपंच अशोक माळी, विश्वनाथ पाटील, वामन देसले, युवराज माळी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली. यात गावात एकमताने हा उत्सव साजरा करण्याचे ठरले. या उत्सवामुळे गावात एकोपा निर्माण होत असतो. यालाच कानबाई मातेचा रोट म्हणतात. ज्या घरात कानुबाईची स्थापना केली जाते अशा सर्व कुटुंबात रोट तयार केले जात असतात. या उत्सवासाठी गावातील बाहेरगावी गेलेली मंडळी या उत्सवानिमित्त गावात येत असतात. अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो.त्यावरची अशी आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेते. कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप दिल  जाते. त्याला अलंकारानं सजविले जाते. कानुमातेची उत्साहात पूजा केली जाते. सोमवारी होणार विसर्जनदरम्यान सोमवारी कानुमातेचे वाजत-गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने उत्साह द्विगुणीत वाढलेला आहे. 

रात्री अहिराणी गीतांसह जागर..खान्देशचे ग्रामदैवत कानुमातेची उत्साहात  स्थापना झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य, परिसरातील महिला रात्रभर अहिराणी भाषेतील गाणी म्हणत असतात. या उत्सवासाठी ‘रोट’चा प्रसाद तयार केला असतो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन ग्रहण करतात. अत्यंत पवित्र समजला जाणारा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. 

टॅग्स :Dhuleधुळे