शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर-शहादा रोडवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:44 IST

नूतनीकरणाची मागणी : जीवघेण्या प्रवासाने वाहन चालकांतून संताप

शिरपूर : अंकलेश्वर-बºहाणपूर या राज्य मार्गावरील शिरपूर ते शहादा दरम्यान रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत आहे़  रस्त्यांची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे़ संबंधित बांधकाम विभागासह काम मंजूर असतांना न करणाºया ठेकेदाराविरोधात मनुष्य सदोषाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात आहे़विधानसभा निवडणूकांच्या आधी रस्त्यांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर झाल्याच्या बतावण्या करणाºया लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दुचाकीवरून फेरफटका मारावा़ मग त्यांच्या लक्षात येईल की, सध्या ग्रामीण भागात किती जीवघेणा प्रवास सुरू आहे़ सर्व जिल्ह्या मार्गांची खड्डयांनी अक्षरश: चाळण झाली आहे़ खड्डे चुकवितांना दुचाकी, रिक्षा, चारचाकींचे छोटे-मोठे अपघात होत आहेत़ मात्र अगदी नोव्हेंबर निम्मेच्यावर झाला तरी बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची साधी तसदी देखील घेतली गेलेली नाही़ जिल्ह्यातील काही मोजकेच रस्ते सुस्थितीत आहेत़ मात्र उर्वरीत सर्वच रस्त्यांवरून गाडी चालविणे सध्या अतिशय जिकिरीचे बनत आहे़ रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकीवेळी आंदोलनेच करायची काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे़ शिरपूर-शहादा मार्गाची चांगलीच चाळण झालेली दिसते़ त्या डांबरी रस्त्यावर डांबर न दिसता खड्डे झालेले दिसतात़ बहुतांशी ठिकाणी खड्यांमुळे रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला आहे़ या रस्त्यावरून वाहने चालवितांना रस्ता कुठे आहे? तो शोधावा लागत आहे़ मोठी वाहने गेल्यावर पाठीमागून येणाºया वाहन चालकांना धुळीचा सामना करावा लागत आहे़ रस्ते गेले खड्डयांत, कोट्यवधी गेले कुठे ?बांधकाम विभागाने कळमसरे उड्डाण पूल ते तºहाडी-तोरखेडा पर्यंत रस्ता दुरूस्ती व नव्याने तयार करण्यासाठी गेल्या १२ डिसेंबर २०१८ रोजी वर्क आॅर्डर काढून ६ कोटी ८७ लाख रूपये मंजूर करून सदर काम कटारीया नामक ठेकेदाराने घेतले़ सदर काम अवघे ६ महिन्यात पूर्ण करणे आवश्यक असतांना देखील अद्यापपर्यंत त्या कामाला सुरूवात नाही़ साधे या मार्गावरील खड्डे सुध्दा भरायला सुरूवात केलेली नाही़ जर कामच करावयाचे नव्हते तर त्या ठेकेदाराने का हे काम घेतले, त्यावर जिल्हा बांधकाम विभागाने आतापर्यंत का कारवाई केली नाही़ सदर काम ६ महिन्याचे आत करण्याचे आदेश असतांना ते लोटून सुध्दा त्या ठेकेदाराला का म्हणून दंड दिला जात नाही़ याच ठेकेदाराने पुन्हा दहिवद फाटा ते गलंकीपर्यंत रस्ता दुरूस्तीचे काम घेतले आहे़ त्या रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत़ त्याचे देखील कामे झालेली नाहीत़ बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांमध्ये साटेलोटे असल्यामुळे त्याकडे बांधकाम प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे़महामार्गावर देखील खड्डे़़़मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर ते पळासनेर गावा दरम्यान देखील खड्डे पडले आहेत़ खड्डे चुकवितांना वारंवार अपघात होत आहेत़ सद्भाव कंपनीने तातडीने या मार्गावर पडलेले लहान-मोठे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी केली जात आहे़खड्डेमय रस्त्यावरून गरोदर महिला, शालेय विद्यार्थी, वयोवृध्द रूग्ण यांना प्रवास करणे धोकादायक आहे़ डांबर उखडले गेल्यामुळे उडत असलेली धुळ, माती याचा सामना करावा लागतो़ रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावा़    - प्रल्हाद सोनार, शिक्षकअनेक महिन्यांपासून शिरपूर-शहादा मार्गाची बिकट दुरवस्था झाली आहे़ प्रवाशी व वाहन चालकांना या खड्डेमय रस्त्यावरून माती व धुळीचा सामना करावा लागत आहे़ रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य असल्याने रस्त्यात खड्डे की खड्डयांत रस्ता हेच समजत नाही़    - सुनिल पाटील, शिक्षक

टॅग्स :Dhuleधुळे