शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीत ३६३ जणांना कोरोनाचा संसर्ग, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

धुळे - जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३६३ ...

धुळे - जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र अजूनही बाधित रुग्ण आढळत आहेत. जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३६३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ४३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन रुग्णांचा भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना या महिन्यात मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी रुग्ण आढळणे सुरूच आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या १०८ रुग्णांवर उपचार सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक कोरोना बाधित रुग्ण आहे. २९ जानेवारी रोजी साक्री तालुका कोरोनामुक्त झाला होता. तालुक्यात एकही बाधित रुग्ण नव्हता, मात्र ३० जानेवारी रोजी तालुक्यातील एका व्यक्तीचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका कोरोनामुक्त झाल्याचा आनंद फार काळ राहू शकला नाही.

आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८१९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४ हजार ३२१ जण बरे झाले आहेत तर ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील सर्वाधिक १७३ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तसेच धुळे तालुक्यातील ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून धुळे तालुक्याचा मृत्युदर जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. तालुक्याचा ४ टक्क्यांपेक्षा अधिक मृत्युदर आहे. शिरपूर तालुक्यातील ६७, शिंदखेडा ४५ व साक्री तालुक्यातील ३१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

१०८ रुग्णांवर उपचार - १०८ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यात धुळे शहरातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. धुळे तालुक्यातील २४ कोरोना बाधित रुग्ण आहेत. साक्री तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असून साक्री तालुक्यात केवळ एक जण कोरोना बाधित रुग्ण आहे. शिरपूर तालुक्यात ७ तर शिंदखेडा तालुक्यात ५ बाधित रुग्ण आहेत. साक्री व शिरपूर तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापूर्वीही कमी झाली होती. मात्र त्याठिकाणी पुन्हा रुग्ण आढळले होते.

५८ रुग्णांना लक्षणे नाहीत -

सध्या उपचार घेत असलेल्या १०८ रुग्णांपैकी ५८ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. २४ रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. १९ जणांना मध्यम तर ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयात १४ व इतर जिल्ह्यात ३ जण उपचार घेत आहेत. तर ७६ जण गृह विलगीकरणात आहेत.