शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यातील जैताणे माहेरवाशीण स्नेहमिलन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:10 IST

लाडशाखीय वाणी समाजाचा उपक्रम

जैताणे : माहेरवाशीण या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपने लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या सहकार्याने निजामपूर- जैताणे येथे माहेरवाशीण स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले होते.  मराठमोळ्या पारंपरिक कलात्मक पध्दतीच्या आविष्काराने दिमाखदार वातावरणात आदर्श विद्यामंदिराच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला.यावेळी माहेरवाशीनींनी वाणी समाजाच्या मंगल वास्तुला अकरा हजार आणि आदर्श विद्यामंदिरास अकरा हजाराची देणगी देऊन दातृत्वातून कर्तृत्वही सिद्ध केले. या माहेरवाशीन स्नेहमीलन सोहळ्यात राज्यासह, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून पाचशेहून जास्त माहेरवाशींणी उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सटाणा येथील रुपाली कोठावदे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून  डॉ.नेहा शिरोरे (नासिक), संध्या सोंजे (नासिक), अर्चना येवले (पुणे), वर्षा शिरोडे (घाटकोपर), प्रिती येवले (नासिक), स्नेहलता नेरकर (नामपूर), दिपाली येवले (जळगाव), स्मिता शिनकर (नासिक), अपर्णा कोतकर (धुळे), उषा अमृतकर (सटाणा), वैशाली पिंगळे (धुळे), कालिंदी येवले (डोंबिवली) आदी उपस्थित होत्या.वाणी समाज मंगल कार्यालयापासून शोभायात्रेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मराठमोळ्या वेशभूषा- केशभूषांनी पारंपारिक संस्कृती जोपासत सर्व माहेरवाशीनी सजलेल्या नटलेल्या होत्या. तेवढयाच उत्साहाने सासुरवाशीणींही शोभायात्रेत सहभागी झाल्या.  शोभायात्रेत माहेरवाशीनींनी वाद्याच्या तालावर व मराठी गितांच्या ठेक्यावर नृत्य करुन आनंद लुटला. ठिकठिकाणी पुष्पांचा वर्षाव करीत शोभायात्रेतील माहेरवाशीनींचे स्वागत करण्यात आले. रस्त्याचा दुतर्फा ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. याप्रसंगी विविध क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करणाºया माहेरवाशीनींचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून ज्येष्ठ महिलांच्याहस्ते गौरव करण्यात आला. तसेच पर्यावरणाचा समतोल रहावा, यासाठी लेकींकडून रोपे वाटप करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमातून पारंपारिक लोकनृत्यांसह बालपणाच्या आठवणी जागवत कलागुणांचे दर्शन घडविले. कार्यक्रमाला हर्षा शिरोडे, कल्पना कोठावदे, निशा बदामे, मोनाली बदामे, अर्चना राणे, मिना राणे आदी माहेरवाशीनी व सासुरवाशीनीचे सहकार्य लाभले. वाणी समाज मंडळाचे सतिश राणे, दगडू पाटील, भुषण बदामे, मनोहर राणे, प्रमोद राणे, संदिप चिंचोले, विनोद मुसळे, सचिन कोठावदे, सुनिल राणे, उदय अमृतकर, मनोज राणे, रवींद्र वाणी, निंबा पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संध्या सोंजे, स्मिता शिनकर यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे