शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मिरची मसाल्याला महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST

उन्हाळा लागताच अनेक घरांमध्ये गृहिणी पापडांबरोबरच वर्षभरासाठी पुरेल एवढा मसाला तयार करून ठेवत असतात. तिखट तयार करण्यासाठी लाल मिरची ...

उन्हाळा लागताच अनेक घरांमध्ये गृहिणी पापडांबरोबरच वर्षभरासाठी पुरेल एवढा मसाला तयार करून ठेवत असतात. तिखट तयार करण्यासाठी लाल मिरची घेऊन ती वाळवून तिखट तयार करीत असतात. तसेच जून-जुलैमध्ये कैरीचे लोणचे घरोघरी टाकले जाते. त्यासाठी व वर्षभरासाठी पुरेल असे घरगुती मसालेही तयार करण्यात येत असतात. मात्र यावर्षी महागाईचा ठसका सर्व वस्तूंना बसू लागला आहे. पेट्रोल महागले आहे. त्याबरोबरच गॅसही महागला आहे. त्यापाठोपाठ आता मिरची-मसाल्याचे दर गगनाला भिडल्याने, लोणचे तसेच वर्षभराचा मसाला कसा तयार करावा, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीस उपस्थित झालेला दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसात होणाऱ्या मसाला, तिखटामुळे बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र आता ही उलाढाल ढप्प होण्याची शक्यताही नाकारता येत नाही

दरम्यान, मिरची व मसाल्याचे दर यावर्षी वाढल्याने, अनेक गृहिणींनी यावर्षी वर्षाचे तिखट-मसाले तयार करण्याचे नियोजन रद्द केल्याचे सांगितले.

मोठ्या कुटुंबाना फटका बसणार

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एकत्रित कुटुंबे आहेत. अशा कुटुंबामध्ये उन्हाळ्यात तिखट-मसाले तयार कऱण्याचे उद्योग केले जातात. तसेच जून-जुलैमध्ये कैरीचे लोणचे तयार करताना याच तिखट-मसाल्याचा वापर केला जात असतो. मात्र मिरची तसेच मसाला साहित्याचे दर आवाक्याबाहेर जात असल्याने, अनेक कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. त्यामुळे मोठ्या कुटुंबांमध्ये फक्त तिखट-मसाले तयार करायचे म्हणून केले जात आहेत. त्यात वर्षभराचा विचार नाही.

दरम्यान, घरगुती तिखट-मसाले तयार होणार नसल्याने, व्यापाऱ्यांचे चांगलेच फावणार आहे.

गुंटूरहून मिरचीची आवक होते

n धुळे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातही मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. त्याचबरोबर मालपूर, सुराय, बाह्मणे येथूनही मिरची बाजारात येते.

n मात्र काही व्यापारी आंध्रप्रदेशातील गुंटूर येथून मिरची आणतात.

आमच्याकडे दरवर्षी उन्हाळ्यातच मिरची खरेदी करून घरगुती तिखट तयार केले जाते. तसेच मसालेही काही प्रमाणात तयार केले जातात. परंतु मिरचीचे दर वाढल्याने, तिखट तयार करण्याचा विचार नाही.

- अंजली वैद्य

आमचे मोठे कुटुंब आहे. त्यामुळे आम्ही तिखट, मसाले घरीच तयार करीत असतात. घरी तयार केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट असतात. मात्र मसाल्याचे दर आवाक्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे यावर्षी तयार मसाला घेऊ.

- साधना पाटील,

गृहिणी