शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहर बंद तर बाजारपेठ सुरूच जनता कफ्युसाठी प्रशासन सज्ज । महापालिकेकडून करणार जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:49 IST

जिल्हा प्रशासनाने केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले.

धुळे : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी यांनी शनिवारपासून हॉटेल्स, पान टपरी, रसवंती, लग्न समारंभ यांच्यावर ३१ मार्चपर्यंत बंदी आणली आहे. असे असतांना शनिवारी शहरातील हॉटेल्स, रसवंती बंद होत्या. मात्र बाजारपेठेत सुरु होती आणि खरेदीसाठी आग्रारोडवर रोजप्रमाणे गर्दी कायम होती. कोरोना विषाणू पसरु नये यासाठी बाजारपेठेतील गर्दी कमी होऊन लोक घरात बसतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून आले.शहरात शनिवारी सकाळपासून मुख्य बाजारपेठेतील हॉटेल्स, पान टपरी आणि रसवंती आदी बंद होत्या. परंतू आग्रारोडवर हॉकर्स नेहमीप्रमाणे लोटगाडया घेऊन उभे होते. दिवसभर आग्रारोडवर नागरिकांची गर्दी दिसून आली.कॉलनी परिसरात आणि प्रमुख रस्ते सोडता अन्य ठिकाणी हॉटेल्स, चहा दुकान, पान टपरी सर्रासपणे खुल्या होत्या. गर्दीने रस्ते गजबजलेले होते. बाजारपेठेत गर्दी आणि हॉटेल्स, चहा दुकान, पान टपऱ्या सुरु असतांना प्रशासनाकडून ते बंद करण्यासाठी विशेष प्रयत्न होतांना दिसत नव्हते.पाच रुग्णांची तपासणीयेथील हिरे महाविद्यालयात शनिवारी पाच रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आले नसून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. तपासणी झालेल्या पाच व्यक्तीपैकी चौघे विदेशातून परतले आहेत. त्यापैकी दोन जणांचा दुबई प्रवास झाला आहे. लंडन व ओमान येथून प्रत्येकी एक व्यक्ती धुळ्यात परतला आहे तर पुणे येथून आलेल्या एकाचा समावेश आहे. या रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांचे नमुने न घेता त्यांना घरी पाठविले. त्यांना १४ दिवस घरी एका स्वतंत्र खोलीत राहण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :Dhuleधुळे