धुळे- धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाच कंदील चौकात शंकर मार्केटला भीषण आगआग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल अन्य जवळपास जिल्ह्यातील व गावातील अग्निशामक दलाचे बंब ही आग आटोक्यात आणण्यासाठी मागवण्यात आलेले आहे. आग अद्यापही मोठ्याप्रमाणात धुमसत आहे आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी तुषार ढाके यांनी दिली आहे.