शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संशयिताच्या शोधासाठी घरोघरी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:29 IST

शिरपुरात परतणाऱ्यांचा लोंढा वाढला : नागरीकांचा घेणार शोध

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर राज्यभरातील अनेक नागरीक शिरपुरात परतत आहेत़ विशेषत: पुणे व मुंबईहून परतणाºया नागरीकांची संख्या मोठी आहे़ त्यामुळे शिरपूरला परतलेल्या नागरीकांच्या आवश्यक त्या चाचण्यांसाठी आता नगरपालिकामार्फत शहरी भागात तर ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा नागरीकांची माहिती घेतली जाणार असल्याचे नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले़पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत़ त्यापाठोपाठ मुंबईतही परिस्थिती गंभीर झाली आहे़ शिरपूरमध्येही अनेकजण शिक्षण, रोजगार व इतर कारणांसाठी पुणे-मुंबईला अनेकजण स्थायिक झाले आहेत़ पुण्या-मुंबईत कोरोना रूग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी बंद करण्यात आली आहेत़शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला सुटी देण्यात आली आहे़ त्यामुळे पुण्या-मुंबईतील अनेकांनी शिरपूरकडे परतीची वाट धरली आहे़ त्यामुळे ट्रॅव्हल्स, रेल्वे आदींच्या माध्यमातून अनेकजण शिरपुरात पोहाचले आहेत़ हे सर्व प्रवाशी वेगवेगळ्या मार्गाने, वाहनाने दाखल झाले आहेत़ त्यामुळे अशा कोरोना प्रभावित भागातून परतलेल्या नागरिकांचा शोध घेतला जाणार आहे़तालुक्यात आजघडीला एकही संशयित अथवा रूग्ण नसला तरीही शेजारील जळगांव जिल्ह्यात संशयित आढळले आहेत़ या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे आवश्यक आहे़ या पार्श्वभूमीवर अशा नागरिकांचा शोध घेवून त्यांना काही लक्षणे आहेत का? याची तपासणी केली जाणार आहे़ यातून कोणीही संशयित रूग्ण उपचाराअभावी राहू नये, त्याचवेळी या संशयितांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होवू नये याची खबरदारी प्रशासन घेत असल्याचे सांगण्यात आले़दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालय वा बँकामध्ये गर्दी होवू नये यासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे