शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सकस आहार, आराम आणि उपचार महत्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:01 IST

कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करा - बालरोगतज्ञ डॉ़ अभिनय दरवडे

ठळक मुद्देकोरोनाच्या निमित्ताने सध्या धास्तावलेले पालक डॉक्टरांकडे गर्दी करतांना दिसत आहेत़ काळजी करण्याचे कारण नाही अशावेळी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या़अन्नपदार्थांमार्फत विषाणूंचा संसर्ग पसरू शकतोसार्वजनिक ठिकाणी अधिक धोकाशौचातून, उलटीतून किंवा कीटकांनी चावल्यावर सुद्धा विषाणू पसरतात. 

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कपावसाळ्यात लहान मुलांना साथीचे आजार व विषाणूंचा संसर्ग पटकन होतो. एक ते पाच वर्ष मुलांचा वाढीच्या काळात मुलांना एका वर्षात १२ विषाणूजन्य आजार होतात. एका विषाणूजन्य आजारातून बरे होत असतानाच मुलांना दुसऱ्या विषाणूचा संसर्ग होतो. जसजशी मुलांचे वाढ होते तसे या संसगाचे प्रमाणही कमी होते. विषाणू हे संसर्गजन्य असतात आणि संपर्क आल्यास ते सहज पसरतात.त्यामुळे सकस आहार, पुरेसा आराम आणि व्यायाम करणे हा त्यासाठी योग्य उपाय आहे. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सहसचिव तथा बालरोगतज्ञ डॉ़ अभिनय दरवडे यांनी ‘लोकमत ’शी बोलतांना दिली़प्रश्न - लहान मुलांना पावसाळ्यात होणारे साथीचे आजार कोणते?उत्तर - लहान मुलांवर पावसाळ्यात किंवा अन्य वेळी विषाणु किंवा सूक्ष्मजंंतुचा अधिक प्रभाव होतो़ विषाणूंची बेसुमार वाढ झाल्यास शरीराच्या कुठल्याही भागात संसर्ग होऊ शकतो़ त्यामुळे सर्वसामान्यपणे फ्लू, सर्दी तसेच घशाचा संसर्ग, जुलाब आणि उलट्या इत्यादी आजार होतात़ याच विषाणूमुळे कांजण्या, इबोलाचा संसर्ग सुद्धा होऊ शकतो़प्रश्न - मुलांमध्ये विषाणूंचा संसर्ग किती वेळ राहू शकतो ?उत्तर- पावसाळ्यात साथीचे आजार लहान मुलांना लगेच होतात़ त्यामुळे मुलांना बरे जरी वाटत असले, तरी काही दिवसानंतर पुन्हा त्रास जाणवू लागतो़ लहान मुलामध्ये विषाणूंचा संसर्ग दोन आठवड्यापर्यंत राहतो़ विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसत नाहीत़ या काळात खोकला व रॅशेस होतात आणि काही दिवसातच ते नाहीसे देखील होतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जावू नये़प्रश्न - विषाणूंचा संसर्ग झाल्यास काय परिणाम होतो ?उत्तर- जर मुलाला खोकला झाला तर तो दोन आठवडे राहु शकतो़ मुलांना बालदमा असेल तर विषाणूंच्या संसगामुळे दमा वाढू शकतो़ काही वेळा, मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि घरघर होऊ शकतो़ काहीवेळा मुलांना अंगावर पुरळ होतात आणि त्यामुळे खाज सुटते, संसर्ग झालेल्या मुलास भूक लागत नाही अशक्त पणा जाणवतो, हातपाय दुखतात. मात्र काळजी करण्याचे कारण नाही अशावेळी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या़घाबरू नका सामना करावाकोरोनाच्या निमित्ताने सध्या धास्तावलेले पालक डॉक्टरांकडे गर्दी करतांना दिसत आहेत़ जगभरात या विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलेले असतांना त्याच्या बद्दल अर्धवट किंवा चुकीची माहिती कानावर पडल्यामुळे सामान्य जनता घाबरलेली आहे़ मुळात कोरोना आणि त्यासारखे सर्वच विषाणू आणि यामुळे होणाºया आजाराबद्दल यानिमित्ताने मोकळी चर्चा होणं खूप महत्वाचे आहे़सार्वजनिक ठिकाणी अधिक धोकाविषाणूंचा संसर्ग लगेच होतो. हा संसर्ग शाळेमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झालेल्या मुलाच्या सानिध्यात आल्यावर होतो. शिंका, खोकला किंवा अस्वच्छ हात किंवा गळणारे नाक ह्यामार्फत संसर्ग होतो. शौचातून, उलटीतून किंवा कीटकांनी चावल्यावर सुद्धा विषाणू पसरतात. अस्वच्छ पाणी आणि अन्नपदार्थांमार्फत विषाणूंचा संसर्ग पसरू शकतो. हवामानात जेव्हा बदल होतात तेव्हा विषाणूंचा संसर्ग पसरतो़

 

टॅग्स :Dhuleधुळे