शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्स आणि अतिक्रमणाचा प्रश्न ‘जीवघेणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST

कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेरोजगार झाले ल्या अनेकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कारण हाच ...

कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. त्यामुळे बेरोजगार झाले ल्या अनेकांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कारण हाच व्यवसाय कमी पैशात सुरू होऊ शकतो. शहरातील प्रत्येक कॉलनी परिसर चौकात अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला. शिवाय पाचकंदील चौकापासून थेट महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत हे भाजीपाला विक्रेते व्यवसाय करीत आहे. बेरोजगारीत उलटे-सुलटे धंदे करण्यापेक्षा इमानदारीने भाजीपाला विक्रीचा धंदा खूप चांगला आहे. पण हा धंदा करतांना त्याचा त्रास होऊ नये हे सुद्धा बघितले पाहिजे. तसे न झाल्यास वाद उद्भवतात. त्यातून गेल्या आठवड्यात घडलेली चाकू हल्ल्यासारखी घटना घडते. तसे घडू नये यासाठी या सर्व हॉकर्संना त्यांची हक्काची जागा हॉकर्स झोन म्हणून उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी आहे. पण त्या जबाबदारी मनपाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

दुसरा गंभीर प्रश्न अतिक्रमणाचा आहे. शहरात दररोज कुठल्यातरी भागात एक टपरी पडत आहे. ती टपरीला रीतसर विजेचे मीटर सुद्धा मिळते. एकूणच बेकायदेशीर गोष्टीला हे शासकीय कार्यालय कायदेशीर पाठबळ देतात. या टपऱ्या शहरात भाईगिरी करणाऱ्याच्या असतात. त्यामुळे सर्वांचेच पाठबळ असते. काहींनी तर टपरी भाड्याने देऊन त्याचे भाडे खातात. काही स्वतःची दुकान असताना दुसऱ्याच्या दुकानासमोर टपरी टाकतात. एका मागून एक अशा टपऱ्यांचे अतिक्रमित कॉम्प्लेक्सच तयार होते. ते अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिसतच नाही. यासंदर्भात तक्रार केली तर विभागातील अधिकारीच तक्रारदाराच्या नावासह अतिक्रमणधारकांना कळविण्यात येते. लगेच ते अतिक्रमणधारक तक्रारदाराला धमकविणे, दादागिरी करतात. त्यामुळे तक्रारदार शांत बसतो. असे किस्से शहरात रोजच घडतात. ते पाहता तर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभाग हे अतिक्रमण कमी करण्याऐवजी वाढविण्याचेच काम जास्त करतात,असेच दिसते. महापालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचे किंवा पदाधिकारी यांचे वर्चस्व दिसत नाही. यासर्व कारणांमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. अतिक्रमित टपऱ्यांमध्ये दोन नंबरचे धंदे ही चालतात. सोडा वॉटरच्या नावाखाली दारू विक्री, पानटपरीच्या नावाखाली सट्टा बेकिंग ही चालते. यातून सर्वांचं विभागांना वेळेवर हप्ता मिळतो, मग अतिक्रमण निघणार कसे.

एकूणच धुळे शहराच्या दृष्टीने हॉकर्स झोन आणि अतिक्रमणाचा प्रश्न ‘जीवघेणा’ ठरत आहे. यावर वेळीच उपाययोजना केली गेली नाहीतर तो नाहूर बनले यात यत्किंचितही शंका नाही. याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची लक्ष देणे आवश्यक आहे.