शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

हजयात्रेकरुंचा मित्रांनी केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 10:45 PM

‘रमजान’च्या हिंदू धर्म कार्याची मित्रांनी घेतली दखल

बभळाज : चांगल्या कामाची कधीतरी दखल घेतली याची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील़ या उदाहरणांमध्ये काही कामं आकस्मिकपणे घडतात़ तर काही कामं नाईलाजाने करावी लागतात़ तर काही कामं हेतुत: पण सहज घडत असतात़ असंच एक उत्तम उदाहरण रमजान गंभीर खाटीक (रा़ चांदसर ता़ धरणगाव जि़ जळगाव) या युवकाच्या बाबतीत देता येईल़नावात त्याचा धर्म सामावलेला आहे़ धर्माने मुस्लिम असणाऱ्या युवकाचे संबंध मित्रांचा गोतावळा सर्व धर्मीयच म्हणावा लागेल, असा आहे़ मुळ चांदसर येथे राहणारा, पण व्यवसायानिमित्त पुण्याला वास्तव्यास असणारा रमजान पुण्यातही मुळ स्वभाव घेऊन वावरतो, हे विशेष़ त्याने पुण्यात ‘आम्ही चांदसरकर पुणेरी’ या नावाने आगळं वेगळं संघटन उभारलंय आणि त्या माध्यमाने विविध सामाजिक उपक्रम आणि धर्मकार्य केली जातात़ यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे रमजानच्या नेतृत्वात आषाढी वारीतल्या वारकऱ्यांना पुण्यात पाणी बॉटल, सरबत, जेवण किंवा नास्ता दरवर्षी दिला जातो़ हा प्रघात गेली १० वर्षे सुरु आहे़ त्यासाठी रमजान हजारो रुपयांची पदरमोड करीत असतो़ पुणेरी चांदसरकरांचं वर्षातून एकदा स्रेहमिलन, गुणी पाल्यांचा गौरव आणि गरजवंतांना योग्य मदत असे कार्य होत असतात़ सत्कार कार्यक्रमातून दोन धर्मातील मित्रांची जवळीकता महत्वपूर्ण आहे़ इतरांसाठी ते आदर्शवत वस्तुपाठ आहे़रमजानच्या या कार्याची माहिती गावांपर्यंत पोहचायला आजच्या आधुनिक जगात कितीसा वेळ लागतो? रमजानने केलेल्या कार्याची दखल घेतली पाहीजे, असा विचार सुरु असताना रमजानची पत्नी मुमताज हज यात्रेला जाणार असल्याचे चांदसर स्थित मित्रांना कळलं़ त्यांनी मुमताज यांच्यासह हजयात्रेकरुंच्या निरोपा दाखल सत्काराचे आयोजन केले़ यात प्रामुख्याने विकास पवार, संजय मुरलीधर पवार, सरपंच सचिन पवार, गजानन पाटील, प्रदीप बाविस्कर, शैलेंद्र वाघ, गोरक्षनाथ कोळी यांच्यासह अन्य मित्रांनी सहभाग घेतला़ कार्यक्रमावेळी धरणगावचे आमदार गुलाबराव पाटील, अब्दुल गफार मलिक, अखलाज करीम सालार, प्रतिभा शिंदे, डी़ जी़ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ हा कार्यक्रम माजी आमदार मुरलीधर पवार यांच्या फार्म हाऊसवर रंगलेला हा दिमाखदार सोहळा भेदाभेदाचे रंग पुसत गेला़

टॅग्स :Dhuleधुळे