बोराडी परिसरात गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 15:13 IST2021-05-22T15:13:25+5:302021-05-22T15:13:45+5:30

वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

Hail in Boradi area | बोराडी परिसरात गारपीट

बोराडी परिसरात गारपीट

बोराडी : शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरात अचानक वातावरणात बदल झाला़ वादळीवारा आणि गारपीटसह पावसाला सुरवात झाल्याने शेतकरी बांधवांची चांगलीच धावपळ उडाली आहे. यात शेतात उघड्यावर असलेल्या गुरांचा चाºयाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाला सुरुवात होतास वीज महामंडळाने वीज पुरवठा बंद केला आहे.
बोराडीसह परिसरात शनिवारी दुपारपर्यंत उन्हाची तिव्रता अधिक असल्याने नागरिकांची कासावीस होत होती़ दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला़ सोसाट्याचा वारा सुटला आणि त्याबरोबर विजेच्या कडकडाटासह गारपीट व पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत असून उन्हाळी पिके काढण्यास सुरवात झाली आहे़ शेतमाल व चारा अजूनही शेतात असताना अशा अचानक आलेले पावसाने शेतकरी बांधवांना धावपळ करावयास लावली. या पावसाने शेतातील चारा व शेतमालचे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Hail in Boradi area

टॅग्स :Dhuleधुळे