शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:52 IST

वडजाई : अमरधाममध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने गैरसोय

वडजाई : थुळे तालुक्यातील वडजाई येथील अमरधाममध्ये लाईटची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास एखादे चारचाकी वाहन बोलावून त्याचे दिवे लावून त्या प्रकाशात किंवा मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. यामुळे संतप्त प्रतिक्रीया उमटत   आहेत. वडजाई येथील अमरधाममध्ये मोठ्या प्रमाणावर दुरवस्था असल्याने अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अमरधाममध्ये छत नसल्यामुळे रणरणत्या उन्हात नातेवाईकांना उभे राहावे लागत आहे. वडजाई येथील अमरधाममध्ये ग्रामपंचायतीकडून साधी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. एखादी दुर्घटना घडल्यास रात्री अपरात्री अंत्यसंस्कार करावे लागतात. अशावेळी ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते. वडजाई येथील एका महिलेचे उपचारादरम्यान नाशिक येथे निधन झाले. तेथून शव येईपर्यंत रात्र झाली. मात्र, अमरधाममध्ये लाईट नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी चारचाकी वाहनाचे लाईट व मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागते. अमरधामजवळ हाकेच्या अंतरावर विजेचे कनेक्शन असलेला पोल आहे. परंतू एक लाईट लावण्याची तसदी ग्रामपंचायतीने घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अमरधाममध्ये बसण्यासाठी ओटा आहे. परंतू शेड नसल्यामुळे आलेल्या नातेवाईकांना उन्हात उभे राहावे लागत आहे. या परिसरात वृक्ष लागवड देखील करण्यात आलेली नाही. या ठिकाणी साफसफाई होत नाही. परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून येते. ग्रामपंचायतीने अमरधाममध्ये त्वरित लाईटची व्यवस्था करावी. अमरधामच्या शेडसाठी निधी उपलब्ध करुन दुरवस्था दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

टॅग्स :Dhuleधुळे