दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 09:40 PM2021-04-04T21:40:32+5:302021-04-04T21:40:54+5:30

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

Fighting in two groups, conflicting lawsuits | दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद

दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्याद

googlenewsNext

धुळे : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात वाद होऊन त्याचे पडसाद हाणामारीत उमटले. ही घटना शंभर फुटी रोडवरील दोन हजार वस्ती भागात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने दोन्ही गटातील ७ व इतरांविरूध्द शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

एका गटाकडून वसीम अक्रम अन्सारी मोहम्मद असलम अन्सारी (३५, रा. मौलवीगंज, कलंदर चौक, धुळे) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दुचाकीवरुन घराकडे येत असताना गर्दी पाहून थांबल्यानंतर भांडणात यांचाही समावेश असल्याचे सांगत माझ्यासह मित्रावर हल्ला करण्यात आला. हाताबुक्क्यांनी मारहाण करीत लाथ मारल्याने दुचाकीवरुन आम्ही खाली पडलो. डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव झाला. यावेळी खिशातील दुधाचे ३ ते ४ हजार रुपये व मित्राच्या खिशातील मोबाईल व ७ हजार रुपये रोख असा ऐवज गहाळ झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडला. याप्रकरणी आसीफ शहा, भोलू शहा, अल्तमाश शहा, अनास फिरोज शहा यांच्या विराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तर, दुसऱ्या गटाकडून आसीफ भोलू शाह (३८, रा. शहीद अब्दुल हमीद नगर, ८० फुटी रोड, धुळे) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पैशांच्या कारणावरुन वाद करत शिवीगाळ करण्यात आली. हातातील चॉपरने छातीवर वार करण्यात आला. लाकडी दांडक्याने डोक्यावर वार करण्यात आला. लोखंडी रॉडने मारुन दुखापतही करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी समीर शाह उर्फ समीर मुल्ला, सलमान शाह, शम्सू (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य काही जणांविरुध्द विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन्ही घटनांचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.

Web Title: Fighting in two groups, conflicting lawsuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे