शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

इथले भय संपेना, ५०८ जीव गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

गतवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसून आला होता़ यातील बहुतांश बाधितांना श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होत ...

गतवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसून आला होता़ यातील बहुतांश बाधितांना श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होत होता़ अशा रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती़ त्यामुळे दिवसाकाठी १०० ते १५० ऑक्सिजन सिलिंडर लागत होते़ ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत होता़ मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे़

कोरोनाची दुसरी लाट

शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे़ ही लाट भयंकर असून धुळ्यासारख्या ठिकाणी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे़ गेल्या काही दिवसात बाधित मृतांची संख्यादेखील वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनसुध्दा चिंतेत सापडले़ राज्य शासनाने कडक निर्बंध घालत वीकेंड लॉकडाऊन करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते़ त्यानुसार प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली़

जिल्ह्यातील आत्तापर्यंत ६०० अहवाल हे पॉझिटिव्ह आलेले आहेत़ एकाच दिवसात अर्थात शनिवारी ११ जणांचा जीव गेलेला आहे़ परिणामी एकूण ५०८ जणांचा जीव आत्तापर्यंत गेलेला आहे़ रुग्णसंख्येने जिल्ह्यात नवा विक्रम करण्यास सुरुवात केलेली आहे़ जिल्ह्यातील साक्रीमध्ये पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वात मोठी संख्या असल्याचे आढळून येत आहे़ जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येने ३३ हजाराचा टप्पा ओलांडला आहे़ एकूण बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ३४४ इतकी झाली आहे़ त्यापैकी २८ हजार ९२६ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे़ धुळे शहरात २०७ आणि ग्रामीणमध्ये ३०१ इतक्या प्रमाणात रुग्ण एका दिवसात आढळून आले आहेत़

दिवसेंदिवस वाढतोय काळाबाजार

जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत ३४ हजारांच्यावर रुग्ण आढळून आले आहेत़ त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दहा ते १५ हजारांच्या आसपास आहे़ कोरोना आजारावरील औषधांचाही मोठा खप वाढला आहे़ त्याचाच फायदा आता औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनी उचलला असल्याचे समोर येत आहे़. जिल्ह्यात शेजारील राज्यांतून रेमडेसिविर या लसीचा पुरवठा करण्यात येत आहे़ चोरीछुपे मार्गाने या लसी जिल्ह्यात आणल्या जात आहेत. या लसी कोणीतरी कुठेतरी लपवून ठेवल्या असल्याने साहजिकच त्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली होती़ त्याचमुळे लसीचा कोणी काळाबाजार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी संजय यादव आणि पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना देण्याची वेळ आली़

काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक तैनात

रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ दिवसेंदिवस शहरासह जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने रेमडेसिविरच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ परिणामी मागणी वाढत असल्याने काळाबाजाराचे प्रमाण वाढले आहे़ हे प्रमाण रोखण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले असून त्यांचे काम सुरू झाले आहे़

एकूण मृत्यू : ५०८

कोरोनाबाधित रुग्ण : ३३ हजार ३४४

घरी सोडलेले रुग्ण : २८ हजार ९२६

प्रलंबित अहवाल : ४९१

धुळे शहरातील रुग्ण : १६७

धुळे तालुक्यातील रुग्ण : ७८

शिरपूर : ४४

शिंदखेडा : ६२

साक्री : १२८

एकूण ४७९